JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tunisha Sharma : तुनिषासोबत 10 दिवसांपूर्वी काय झालं होतं? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

Tunisha Sharma : तुनिषासोबत 10 दिवसांपूर्वी काय झालं होतं? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. तुनिषाच्या कुटुंबाने आरोप केल्यानंतर तिच्यासोबत काम करणारा अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अलीबाबा ही सीरियल सुरू होत असतानाच तुनिषा आणि शिझान एकमेकांच्या जवळ आले आणि नंतर दोघांमध्ये रिलेशनशीपला सुरूवात झाली, पण शिझानने धोका दिल्यानंतर तुनिषा तणावात होती, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुनिषा शर्मा अलीबाबा सीरियल सुरू व्हायच्यावेळी शिझानच्या संपर्कात आली, यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. 10 दिवसांपूर्वीच तुनिषाला एंझायटी अटॅक आला होता, यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात असतानाच तुनिषाने तिच्यासोबत धोका झाल्याचं आईला सांगितलं. टुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणात लव्ह जिहाद असेल तर…, राम कदमांचा इशारा काही दिवसांपूर्वीच तुनिषा घाबरली होती, तसंच तिने आपल्याला फसवण्यात आल्याचं सांगितलं, असं तुनिषाचे मामा पवन शर्मा म्हणाले आहेत. याप्रकरणी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तुनिषावर 27 तारखेला मीरा रोडला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिझानला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी टीव्ही सीरियलच्या सेटवरच तुनिषाने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली, सुरूवातीच्या तपासानंतर शिझानवर संशय आला त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शिझान मोहम्मद खानवर आयपीसीच्या कलम 306 नुसार आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या