Tu tenva tashi
मुंबई, 08 सप्टेंबर : झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. सौरभ अनामिकाची प्रेमळ लव्हस्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत आता सौरभ आणि अनामिकाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण हे नातं सुरु होताना या दोघांना काही संकटांचा सामना करावा लागणार हे निश्चित. आता मालिकेत अनामिका आणि सौरभच्या नात्यात नवीन व्यक्तीची एंट्री झाली आहे. त्यामुळे आता मालिकेला आणखीनच वेगळं वळण लागलं आहे. हि व्यक्ती म्हणजे अनामिकाचा पहिला नवरा आकाश जोशी हा आहे. आता मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत सध्या अनामिका सौरभकडे राहायला आली आहे. आता हे दोघे नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. पण आता अनामिकाचा भूतकाळ पुन्हा परतला आहे. आकाश अनामिकाच्या घरी आला आहे. त्याने सध्या अनामिकाला धमकी द्यायला सुरुवात केली आहे. त्याने अनामिकाला सौरभसोबत असलेलं नातं तोडायला सांगितलं आहे. त्याच ऐकून अनामिकाने सौरभला लग्नासाठी नकार दिला आहे. तसेच तिला पटवर्धन कुटुंबसोबत राहायचं नाही असं देखील तिने सांगितले आहे. आता अनामिकाची मजबुरी सौरभला समजेल का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.
आता सौरभ आणि अनामिकाच्या नात्यावर आकाशाचा एंट्रीचा काय परिणाम होईल. तसेच राधाने आता कुठे सौरभला स्वीकारलं आहे त्यामुळे आकाशच्या येण्यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. आकाशची भूमिका प्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ हे साकारणार आहेत. हेही वाचा - Atul Khatri : ब्रम्हास्त्र सिनेमाचं नाव बदलून ब्रम्हास्त्र फाइल्स ठेवा; कॉमेडियन अतुल खत्रींचं मोठ वक्तव्य आधीच स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या मालिकेत आता अशोक समर्थ यांची एंट्री झाली आहे. मात्र मालिकेतील हा ट्विस्ट प्रेक्षकांना फारसा आवडलेला दिसत नाहीये. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षकांनी ‘तू तेव्हा तशी’ मालिकेची तुलना ‘माझी तुजी रेशीमगाठ’ मालिकेशी केली आहे. प्रेक्षकांनी या पोस्टवर ‘काही तरी वेगळं दाखवा,’ ‘प्रत्येक मालिकेत तेचतेच नको’ अशा कमेंट केल्या आहेत.