श्वेता तिवारी ही अशी अभिनेत्री आहे जी भारतीय आउटफिट्समध्ये तर अप्रतिम दिसतेच, परंतु वेस्टर्न आउटफिट्ससुद्धा तिच्यावर तितकेच शोभून दिसतात. बघूया फॅशन क्वीन श्वेता तिवारीचे काही असे लुक्स जे तुम्हीसुद्धा कॉपी करू शकता.
या फंकी प्रिंट पॅन्ट-सूटमध्ये श्वेता तिवारी जबरदस्त दिसत आहे. तिने एक लेयर्ड हार घातला आहे. यासह तिने पॉईंटेड हील्स परिधान केले आहे. श्वेता तिवारीच्या या लूकला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
श्वेता तिवारीने डेनिम शॉर्ट स्कर्ट आणि व्हाईट आणि रेड स्ट्रीप क्रॉप टॉप असलेले जाकेट घातले आहे. यासह स्पोर्ट शूज त्यांना स्पोर्टी लूक देत आहेत. मित्रांसह फिरायला जाताना आपण हा लुक ट्राय करू शकता.
फ्लोरल ड्रेसमध्ये श्वेता तिवारीचा लूक खूप छान दिसत आहे. उन्हाळ्यात हा लुक तुमच्यावरही छान दिसेल.
अॅनिमल प्रिंट कायम फॅशनमध्ये असते. श्वेता तिवारीने अॅनिमल प्रिंट ड्रेससह लॉन्ग बूट्स परिधान केले आहेत आणि लाईट मेकअप केला आहे. तिचा हा लूकसुद्धा खूप दमदार आहे.
या फ्लोरल प्रिंट गुलाबी शिफॉन साडीमध्ये श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसत आहे. यासह तिने डँगलर्स परिधान केले आहेत. आपण उन्हाळ्यात तिचा हा लूक कॉपी करू शकता.
या पिंक कलरच्या बनारसी साडीमध्ये श्वेता तिवारी मोहक दिसत आहे. श्वेताने गुलाबी साडीसह कॉन्ट्रास्ट कलरचं फिरोजी ब्लाउज परिधान केलं आहे. हेवी चोकर नेकलेस, कानातले, बांगड्या आणि अंगठी या लूक मध्ये आणखी भर पाडतायत.
या पीच कलर प्लेसूटमध्ये श्वेता तिवारी खूपच क्यूट दिसत आहे. या लूकसह श्वेताने आपले केस मिड हाय पोनी स्टाईलमध्ये ठेवले आहेत. कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हा परफेक्ट लूक आहे.