JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Marathi Serial: सुख म्हणजे नक्की काय असतं! अरुंधती-दीपाला गौरीची धोबीपछाड; बघा या आठवड्याचा TRP चार्ट

Marathi Serial: सुख म्हणजे नक्की काय असतं! अरुंधती-दीपाला गौरीची धोबीपछाड; बघा या आठवड्याचा TRP चार्ट

मालिकांच्या टिआरपी शर्यतीत केवळ आणि केवळ स्टार प्रवाह ( Star Pravah) वाहिनी सर्वात पुढे आहे. कलर्स ( Colors Marathi) आणि झी मराठीवरील ( Zee Marathi) मालिका टिआरपीमध्ये ( TRP) दिसत नाहीत. या आठवड्यात झी मराठीवरील केवळ एकच मालिका टॉप 10 मध्ये असून बाकी स्टार प्रवाहनं आपला मान कायम राखला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं (sukh mahnje nakki kay asat) ही मालिका या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर आली आहे. पाहा या आठवड्याचा टिआरपी चार्ट

0110

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनं या आठवड्यात सगळ्या मालिकांना मागे टाकत पहिला क्रमांक गाठला आहे. गेली अनेक दिवस मालिका टिआरपीच्या शर्यतीत मागे पडली होती. परंतू या आठवड्यात दीपा आणि अरुंधतीला धोबीपछाड दिला आहे. मालिका 6.8 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0210

मागील 2 महिन्यांपासून पहिल्या क्रमांकावर असलेली रंग माझा वेगळा ही मालिका या आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेला 6.6 टिआरपी रेटिंग मिळालं आहे.

जाहिरात
0310

या आठवड्यात आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा मालिका एकामागोमाग आहेत. अरुंधती यावेळी तिसऱ्या क्रमांकावर असून नेहमीप्रमाणे दीपा आणि अरुंधतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. आई कुठे काय करते मालिकेला 6.2 टिआरपी रेटिंग मिळालं आहे.

जाहिरात
0410

स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका सध्या टिआरपीच्या शर्यतीत पाहायला मिळत आहेत. कीर्ती आणि शुभम यांचा बदलेला लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून फुलाला सुगंध मातीचा ही मालिका या आठवड्यात 6.1 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0510

तुझेच मी गीत गात आहे ही मलिका या आठवड्यात 5व्या क्रमांकावर असून मालिकेला 5.6 टिआरपी रेटिंग मिळालं आहे. स्वराचा स्वराज झाल्यानंतर मालिकेला नवं वळण आलं आहे. प्रेक्षकांना मालिका आवडत असल्याची ही पोच पावती आहे.

जाहिरात
0610

5.7 टिआरपी रेटिंगसह रंग माझा वेगळा ही मालिका पुन्हा एखदा सहाव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0710

अप्पू आणि शंशाक यांची धम्माल या आठवड्यात कुठेतरी कमी पडल्याचं दिसतंय. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका या आठवड्यात 5.6 टिआरपी रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0810

झी मराठीच्या सगळ्याच मालिकांचं टिआरपी रेटिंग पार गडबडून गेलं आहे. झी मराठीवरील केवळ माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका 5.3 टिआरपी रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0910

तर पुन्हा एकदा 4.9 टिआरपी रेटिंगसह कीर्ती शुभमची गोष्ट नवव्या क्रमांकावर आली आहे.

जाहिरात
1010

शंतनू आणि पल्लवी यांच्या स्वाभिमानची कहाणी काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याचं पाहायला मिळतंय. मालिका दहाव्या क्रमांकावर आली असून मालिकेला 4.4 हे सर्वात कमी रेटिंग मिळालं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या