सध्या मराठी मालिकांमध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्यातही आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या मालिका प्रेक्षकांचा प्रचंड लाडक्या असल्याचं पाहायला मिळत आहेत. या आठवड्याचा टीआरपी चार्ट समोर आला असून जाणून घ्या कोणत्या मालिकेला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
टीआरपीच्या शर्यतीत नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाहवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका टॉप वनवर आहे. मालिकेला 6.9 टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
यावेळी 'आई कुठे काय करते' ही मालिका पुन्हा एकदा टॉपमध्ये आली असून दीपा आणि अरुंधतीमध्ये पुन्हा एकदा शर्यत पाहायला मिळणार आहे. मालिकेत सध्या दाखवण्यात आलेला यशचा इमोशनल ट्रक प्रेक्षकांना आवडला आहे. मालिकेला 6.6 टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
तर या आठवड्यात 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यात मालिका दुसऱ्या क्रमांकावर होती. मालिकेला यावेळी 6.5 टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
या आठवड्यात 'फुलाला सुगंध मातीचा' मालिका 6.3 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यात मालिका तिसऱ्या क्रमांकावर होती.
यावेळी टॉप 5 मध्ये 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका आहे. मालिकेत सध्या अनेक कलाकारांची एंट्री होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मालिका पाहण्यासाठी उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेला 5.8 टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका या आठवड्यात सहाव्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यातही सहाव्या क्रमांकावरच होती. यावेळी मालिकेला 5.4 टीआरपी रेटिंग मिळाले आहेत.
सातव्या क्रमांकावर पुन्हा एकदा 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका आहे. मालिकेचा महाएपिसोड प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून एपिसोडसह मालिकेला सातव्या क्रमांकावर 4.9 टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
तर झी मराठीवरील टॉप वन मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' यावेळी आठव्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यात मालिका सातव्या क्रमांकावर होती. मालिकेला 4.7 टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
तर स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' ही मालिका या आठवड्यात नवव्या क्रमांकावर आहे. मालिकेला 4.3 रेटिंग मिळालं आहे.
'मन उडू उडू झालं' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. झी मराठीवरील टॉप 2 मध्ये असलेल्या या मालिकेला टीआरपी रेटींगमध्ये 4.2 रेटिंग मिळालं आहे.