JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / लग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....

लग्नानंतर महिन्याभराने या नवनिर्वाचित खासदाराने शेअर केला फोटो आणि....

लग्नानंतर महिन्याभराने रविवारची सकाळ निवांत मिळताच नवनिर्वाचित खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आणि त्यावर चाहत्यांनी अक्षरशः हजारो कमेंट्स केल्या.

0115

लग्नानंतर महिन्याभरातच नवीन खासदारांना संसदेत हजेरी लावावी लागली. बजेट सेशनमधली धावपळ सुरू असताना रविवारची सकाळ निवांत मिळताच नवनिर्वाचित खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि त्यावर चाहत्यांनी अक्षरशः हजारो कमेंट्स केल्या.

जाहिरात
0215

नुसरत जहाँ बंगालमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी निखिल जैनबरोबर नुकतंच लग्न झालं.

जाहिरात
0315

निखिल जैन आणि नुसरत जहाँ यांनी टर्कीला डेस्टिनेशन वेडिंग केलं. त्याचीही बरीच चर्चा झाली.

जाहिरात
0415

नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

जाहिरात
0515

तृणमूल काँग्रेसकडून नुसरतनी निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर लगेचच लग्नाची धामधूम झाली.

जाहिरात
0615

संसदेच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री आणि TMC च्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्याबरोबर जोडीने नुसरत या वेषभूषेत दिसल्या.

जाहिरात
0715

लग्नानंतर आणि खासदार झाल्यानंतर नुसरत सोशल मीडिया स्टार झाल्या. पण त्यांची स्वतःची सोशल मीडियावरची अॅक्टिव्हिटी मात्र कमी झाली.

जाहिरात
0815

बऱ्याच दिवसांनी रविवारी सकाळी त्यांनी हा फोटो शेअर केला. हॅपी संडे असं चाहत्यांना विश करत त्यांनी नो मेकअप, नो फिल्टर असंही या फोटोखाली लिहिलं. या फोटोंना हजारोंनी लाईक्स मिळाले.

जाहिरात
0915

यापूर्वीही नुसरत यांचे काही फोटो सोशल मीडियावर असेच गाजले होते. त्यात त्यांच्या लग्नविधींच्या फोटोंचा समावेश होता.

जाहिरात
1015

बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांच्या संसदेतल्या वावरावर सर्वांचं लक्ष आहे. त्या पहिल्यांदा संसदेत दाखल झाल्या त्या नवविवाहितेच्या आभूषणांसह.

जाहिरात
1115

नुसरत यांनी भांगात सिंदूर भरलेला होता आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलेलं होतं. यावरून मुस्लीम समाजातील काही घटकांनी त्यांना लक्ष्य केलं. पण आपण धर्मनिरपेक्षता मानतो, असं उत्तर नुसरत यांनी दिलं.

जाहिरात
1215

जूनच्या पहिल्या आठवण्यात नुसरत यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्याबरोबर लग्न केलं. संसदेच्या बजेट सेशनमध्ये त्यांनी भाषणसुद्धा केलं.

जाहिरात
1315

नुसरात जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या दोन्ही बंगाली अभिनेत्री पहिल्या दिवसापासूनच संसदेत लक्ष वेधून घेत आहेत.

जाहिरात
1415

जून 25 ला नवनिर्वाचित खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्यावर नुसरत जहाँ यांनी शपथ घेतल्यानंतर वंदे मातरम् असंही म्हटलं.

जाहिरात
1515

नुसरत आणि मिमी चक्रवर्ती दोघी तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत. संसदेच्या आवारात जीन्समध्ये दाखल झाल्या त्यावरून दोघींना ट्रोल केलं गेलं होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या