JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / स्टंट करताना टायगर श्रॉफला दुखापत; VIDEO शेअर करत म्हणाला...

स्टंट करताना टायगर श्रॉफला दुखापत; VIDEO शेअर करत म्हणाला...

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाशिवाय चित्रपटातील अॅक्शन स्टंटसाठी ओळखले जातात. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ.

जाहिरात

टायगर श्रॉफ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर : बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयाशिवाय चित्रपटातील अॅक्शन स्टंटसाठी ओळखले जातात. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ. टायगर त्याच्या अॅक्शन आणि स्टंट सिनेमांमुळे इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहे. टायगर त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटांमध्ये भरपूर अॅक्शन मसाला ठेवतो, ज्यासाठी त्याला खूप मेहनतही घ्यावी लागते. नुकतंच टायगरने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील एक अॅक्शन स्टंट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा अॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफसोबत अपघात झाला आहे. अॅक्शन स्टंट करताना टायगरसोबत अपघात झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत टायगर श्रॉफने लिहिले की, ‘काँक्रीट वॉश बेसिन तोडताना माझा पाय मोडला. मला वाटले की मी ते करेन आणि मी अधिक जोर लावला. पण माझ्या बचावात बेसिनही तुटले’. व्हिडिओमध्ये दिसत आहे की टायगर एका माणसासोबत जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये आहे. तो माणूस स्वत:चा बचाव करण्यासाठी समोर वॉश बेसिन आणतो आणि टायगर त्याला तोडतो. मात्र यामुळे टायगरच्या पायालाही दुखापत होते.

संबंधित बातम्या

टायगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. याशिवाय पोस्टवर भरभरुन कमेंट येत आहेत. शानने लिहिले की, ‘तुम्ही अविश्वसनीय आहात, परंतु तुम्ही देखील मानव आहात हे जाणून आनंद झाला’,शिल्पा शेट्टीने लिहिले, ‘ओह गॉड टायगर’, त्यानंतर दिग्दर्शक साबीर खानने लिहिले, ‘या दिवशी आम्ही 24 तास शूटिंग केले. तो छान होते.’ दिग्दर्शकाच्या कमेंटवरून हा टायगरचा जुना व्हिडिओ असल्याचं समजतंय. या दोघांनी ‘हिरोपंती’, ‘मुन्ना मायकल’ आणि ‘बागी’मध्ये एकत्र काम केले आहे.

दरम्यान, टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो लवकरच ‘गणपत’ आणि नंतर अक्षय कुमारसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसणार आहे. गणपतमध्ये टायगरसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या