JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ...ते सेलिब्रिटी जे अजूनही The Kapil Sharma Show मध्ये गेले नाहीत; काय आहेत कारणं...पाहा PHOTOS

...ते सेलिब्रिटी जे अजूनही The Kapil Sharma Show मध्ये गेले नाहीत; काय आहेत कारणं...पाहा PHOTOS

आपल्या सर्वांना ‘द कपिल शर्मा शो’ पाहायला फार आवडतो. त्यात येणारे कलाकार आणि कपिल शर्मा यांच्यात मोठा हास्यविनोद रंगतो. त्यामुळं हा शो फार लोकप्रिय ठरलेला आहे. परंतु बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे अजूनही The Kapil Sharma Show मध्ये गेलेले नाहीत. पाहा PHOTOS

0110

कपिल शर्मा शो मध्ये बॉलिवूड, क्रिकेट आणि इतर क्षेत्रातील अनेक सेलेब्रिटी येत असतात. विशेष म्हणजे जे काही बॉलिवूडमधील नवीन कलाकार असतात ते तर नेहमीच या शो मध्ये येतात. परंतु असेही काही स्टार कलाकार आहेत जे अजूनही या शो मध्ये गेलेले नाहीत.

जाहिरात
0210

कपिल शर्मा शो मध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. परंतु आतापर्यंत एकदाही अभिनेता आमिर खान या शो मध्ये आलेला नाही. आमिर खान नेहमी पार्टी किंवा कोणत्याही शो पासून दूर राहणं पसंत करतो.

जाहिरात
0310

आपल्या जबरदस्त अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाना पाटेकर यांनी आतापर्यंत एकदाही कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावलेली नाही. ‘वेलकम बॅक’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अभिनेता अनिल कपूर, जॉन अब्राहम हे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते परंतु नाना आले नाही.

जाहिरात
0410

दक्षिण भारतातील सुपरस्टार रजनीकांत हे देखील आतापर्यंत एकदाही कपिल शर्मा शो मध्ये आलेले नाही. त्यामुळं अनेकदा चाहत्यांनी रजनीकांत यांना द कपिल शर्मा शो मध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

जाहिरात
0510

त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर या देखील The Kapil Sharma Show मध्ये आलेल्या नाही. कपिल शर्मा हा लता दिदींचा मोठा चाहता आहे. त्याची नेहमी इच्छा राहिलेली आहे की लता मंगेशकर यांनी आपल्या शो मध्ये यायला हवं.

जाहिरात
0610

कपिल शर्मा शो मध्ये आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सने हजेरी लावलेली आहे, परंतु अजूनही भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कपिल शर्मा शो मध्ये पाऊल ठेवलेलं नाही. कपिलने अनेकदा धोनीला आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं होतं, परंतु त्यात तो यशस्वी होऊ शकलेला नाही.

जाहिरात
0710

त्याचबरोबर कपिल शर्माने अनेकदा क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला आपल्या शो मध्ये बोलावलं होतं. परंतु सचिन आपल्या व्यस्त शेड्यूलमुळं येऊ शकला नाही.

जाहिरात
0810

अभिनेत्री राधिका आपटे देखील आतापर्यंत कपिल शर्मा शो मध्ये आलेली नाही. (फोटो साभार:radhikaofficial/Instagram)

जाहिरात
0910

अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी आपल्या वक्तव्यांमुळं आणि आपल्या कामांमुळं चर्चेत असते. परंतु ती अजूनही ‘द कपिल शर्मा शो’ आलेली नाही. (फोटो साभार:reallyswara/Instagram)

जाहिरात
1010

भीष्म पितामह आणि शक्तिमान या मालिकेमुळं प्रसिद्ध झालेले अभिनेते मुकेश खन्ना देखील या शो मध्ये आजपर्यंत आलेले नाही. त्यांनी या शो वर याआधी टीका ही केली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या