JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Year Ender 2021: 'या' टॉप 10 वेब सीरीजनी यावर्षी केला होता धमाका; पाहा LIST

Year Ender 2021: 'या' टॉप 10 वेब सीरीजनी यावर्षी केला होता धमाका; पाहा LIST

Top Web Series Of 2021 : आता 2021 हे वर्ष संपत आहे. त्यामुळं या वर्षात काही वेब सीरीज फार सुपरहिट राहिलेल्या आहेत. कोरोना महामारीमुळं प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट अथवा वेब सीरीज पाहाव्या लागल्या होत्या. परंतु आता या वर्षी सुपरहिट राहिलेल्या काही वेब सीरीजची लिस्ट जाहिर करण्यात आलेली आहे. पाहा लिस्ट…

0111

IMDb च्या रँकिंगमध्ये TVF Aspirants ला 2021 च्या टॉप 10 वेब सिरीजमधील डेटाच्या आधारे सर्वाधिक क्रमांक मिळाले आहेत. या वर्षी 'Scam 1992', 'मिर्झापूर सीझन 2', 'गुलक सीझन 2', 'क्रिमिनल जस्टिस' अशा अनेक वेब सीरिजची चर्चा झाली आणि पाहिली गेली. परंतु आता 'TVF Aspirants', 'धिंडोरा' आणि 'द फॅमिली मॅन' यासह 10 वेब सिरीजची सर्वाधिक पाहिली जाणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात
0211

IMDb च्या रँकिंगमध्ये TVF Aspirants पहिल्या क्रमांकावर आहे. IAS ची तयारी करणाऱ्या 3 मित्रांची कहाणी तरुणांना आवडली. विद्यार्थ्यांचा संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आला आहे. या मालिकेतील गाणीही तरुणाईला फार आवडली होती.

जाहिरात
0311

भुवन बामचा 'धिंडोरा' ही सिरीज दुसऱ्या क्रमांकावर होती. एका सामान्य कुटुंबाचे दैनंदिन जीवन आणि स्वप्नं त्यात दाखवली आहेत. भुवनने त्याच्या इंस्टाग्रामवर IMDb ची यादी शेअर करून सर्व दर्शकांचे आभार मानले आहेत.

जाहिरात
0411

तिसऱ्या क्रमांकावर 'द फॅमिली मॅन' ला पसंती मिळाली आहे. पहिल्या सीझनच्या अफाट यशानंतर दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचे प्रेम मिळालं.

जाहिरात
0511

IMDb च्या रँकिंगमध्ये संजय कपूर स्टार वेब सीरिज 'The Last Hour' ला चौथा क्रमांक मिळाला आहे.

जाहिरात
0611

सुनील ग्रोव्हरच्या 'सनफ्लॉवर' ला पाचव्या क्रमांकावर स्थान मिळालं आहे. या मालिकेतील प्रेक्षकांना सुनील ग्रोव्हरचा दमदार अभिनय खूप आवडला होता. सुनीलला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट समीक्षक पुरस्कार ही मिळाला आहे.

जाहिरात
0711

रोनित रॉय आणि रिचा चढ्ढा यांची सिरीज 'Candy' ही सहाव्या क्रमांकावर आहे. या थ्रिलर मालिकेत एका बोर्डिंग स्कूलमधील मुलाच्या गूढ मृत्यूनंतर ड्रग रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

जाहिरात
0811

या सिरीजमध्ये सत्यजित रे यांच्या प्रेम, वासना, विश्वासघात आणि सत्यावर आधारित चार कथा दाखवल्या आहेत. या वेब सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, केके मेनन, अली फजल, राधिका मदन, श्वेता बसू असे कलाकार आहेत. ही सिरीज सातव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0911

Disney+ Hotstar च्या 'Eclipse' ने क्रमवारीत आठवं स्थान पटकावलं आहे. सत्य व्यास यांच्या 'चौरासी' या प्रसिद्ध कादंबरीवरून प्रेरित ही वेबसिरीज 1984 च्या शीख दंगलीतील प्रेमकथा दाखवते.

जाहिरात
1011

हॉटस्टारची क्राईम थ्रिलर मालिका 'November Story' नवव्या क्रमांकावर आहे. तमन्ना भाटियाने यात अप्रतिम भूमिका केलेली आहे.

जाहिरात
1111

कोंकणा सेन शर्मा आणि मोहित रैनाचा 'Mumbai Diaries 26/11' शेवटच्या स्थानावर आहे. 26/11 च्या घटनेवर आधारित ही वेब सिरीज प्रेक्षकां चांगलीच आवडली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या