प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत आली आहे. त्याचबरोबर दिशा पाटनी ही तिचा रूमर्ड बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. बॉलीवूडमध्ये त्यांच्यासारखी आणखी काही जोडपी आहेत, जे अनेकदा एकत्र दिसतात पण त्यांना लव्ह लाईफबद्दल विचारले असता, ते चौफेर उत्तरे देतात अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपलं नातं गुपित ठेवलेलं आहे. पाहा PHOTOS
बॉलीवूडचे सेलिब्रिटी आपल्या लव्ह लाईफबद्दल चाहत्यांना सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत, तर काही सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांना लग्नापर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवायचं आहे. कियारा अडवाणी, दिशा पटानी यांसारख्या आणखी काही अभिनेत्री आहेत, ज्या अनेकदा त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत दिसतात.
कियारा आणि सिद्धार्थची जोडी केवळ पडद्यावरच नाही तर पडद्याबाहेरही चाहत्यांना आवडली आहे. ते बॉलीवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांना अनेकदा एकत्र हँग आउट करताना पाहिले गेले आहे. चाहते फक्त त्यांच्या नात्याच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.
श्रद्धा कपूर अनेक प्रसंगांमध्ये रोहन श्रेष्ठसोबत दिसली आहे. ते एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या मीडियामध्ये खूप चर्चेत होत्या, पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
मौनी रॉय सोशल मीडियावर बराच वेळ घालवते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन बाळगते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती 2022 मध्ये सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधू शकते.
ते दुबई किंवा इटलीमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आतापर्यंत मौनीने तिच्या लग्नाच्या किंवा रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल काहीही सांगितलेले नाही.
दिशा पाटनी अनेकदा टायगर श्रॉफ आणि त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसली आहे. ते अनेकदा एकत्र व्हेकेशन, डिनरला सोबत जाताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.
दिशा आणि टायगरला जेव्हा जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल विचारले जाते तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरं देऊन दूर जातात, पण त्यांची रिलेशनशिप त्यांच्या हावभावावरून स्पष्ट होते.
करिश्मा तन्ना एकेकाळी उपेन पटेलसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती, मात्र आता ती वरुण बंगेरासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. 5 फेब्रुवारी 2022 रोजी ती वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधणार असल्याच्या बातम्याही समोर आलेल्या आहेत.