बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाच्या पस्तीशीत ते चाळीशीतही मुलांना जन्म दिला आहे.
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी प्रेग्नंसीची परिभाषाच बदलली आहे. योग्य वेळेत लग्न आणि योग्य वेळेत मुलं व्हावीत असं म्हटलं जातं, किंबहूना शास्त्रीय दृष्ट्याही तेच खरं मानलं आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री सध्या ३५ ते अगदी चाळीशीतही मुलांना जन्म देताना दिसत आहेत. पाहा कोण आहेत.
शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये धुमधडाक्यात राज कुंद्राशी विवाह केला होता. 2012 साली तिने आपल्या मुलाला जन्म दिला तेव्हा ती ३७ वर्षांची होती. तर २०२० मध्ये तिने सरोगेसी पद्धतीने मुलीला जन्म दिला आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने लग्नाच्या ४ वर्षांनतर मुलीला जन्म दिला. तेव्हा ऐश्वर्या ३८ वर्षांची होती.
नेहा धूपियाने 2018 साली आंगद बेदीशी विवाह केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची मुलगी हीरचा जन्म झाला, तेव्हा नेहा ३७ वर्षांची होती. तर आता ४० व्या वर्षी ती पुन्हा एकदा आई होत आहे.
करीना कपूर खाननेही ३६ व्या वर्षी मुलगा तैमुरला जन्म दिला होता. तर ४० व्या वर्षी तिने पुन्हा एकदा मुलगा जेहला जन्म दिला आहे.
राणीने अगदी गुपचूप आदित्य चोप्राशी विवाह केला होता. २०१५ साली त्यांची मुलगी अदिराचा जन्म झाला. तेव्हा राणी ३७ वर्षांची होती.