देवोलिना भट्टाचार्जीने द केरळ स्टोरी' सिनेमा पाहून त्यावर आपलं मत मांडलं
मुंबई, 17 मे- सध्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची पर्चं चर्चा सुरु आहे. या चित्रपटवरुन अनेक ठिकाणी वादही सुरु आहे. ‘द केरळ स्टोरी’ रिलीज होण्यापूर्वीच त्याचा विरोध सुरु झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकारण अधिकच तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत बसून हा चित्रपट पाहिला.
‘द केरळ स्टोरी’
च्या मुद्द्यावरुन सर्वसामान्य प्रेक्षकही दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री
देवोलिना भट्टाचार्जी
ने तिचा पती शाहनवाज शेखसोबत ‘द केरळ स्टोरी’ पाहिला.इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने याबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून गोपी बहूच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलिना भट्टाचार्जी होय. देवोलिना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. देवोलिना भट्टाचार्जीने काही काळापूर्वी शाहनवाज शेख या आपल्या मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. एका ट्विटला उत्तर देत आणि पतीची बाजू मांडत म्हटलं आहे, ‘हे नेहमीच होत नाही. माझे पती मुस्लिम आहेत आणि ते माझ्यासोबत चित्रपट पाहायला गेले होते. या चित्रपटाचं त्यांनी कौतुक केलं. या गोष्टीमुळे तो दुखावला गेला नाही किंवा हा चित्रपट आपल्या धर्माविरुद्ध आहे असं त्याला अजिबात वाटलं नाही. माझ्या मते प्रत्येक भारतीय असाच असावा. (हे वाचा:
दबंग IPS अधिकऱ्याने उघडपणे मागितली शाहरुख खानच्या मुलाची माफी, जाहीर पत्रातून उघड केली सर्व सत्ये
) देवोलीनाने हे ट्विट इन्कॉग्निटो नावाच्या युजरने पोस्ट केलेल्या दुसर्या ट्विटला उत्तर देताना लिहिलं आहे, यामध्ये असं लिहिलं आहे की, ‘माझ्या सहकलाकाराची मैत्रीण निधीचं दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिने तिच्या प्रियकराला ‘द केरळ स्टोरी’ बघायला सांगितलं. त्याने केवळ चित्रपट पाहण्यास नकार दिला नाही तर तिला शिवीगाळही केली आणि प्रेयसीला इस्लामोफोबिक म्हटलं. ती घाबरली आणि तिने तिच्या प्रियकराला विचारलं की, तो इतका वाईट का वागत आहे. ती मुस्लीमाला डेट करत असताना ती मुस्लिमविरोधी कशी असू शकते’. ट्विटमध्ये पुढे लिहण्यात आलं आहे की, ‘तिच्या बॉयफ्रेंडने तिला म्हटलं की, जर ती मुस्लिमविरोधी नसेल तर तिने मुस्लिम बनून त्याच्याशी लग्न करावं. तिने होकार दिला, पण तरीही तिला चित्रपट बघायचा होता म्हणून ती एका मैत्रिणीसोबत गेली. चित्रपट पाहून ती परत आली तेव्हा तिने प्रियकराला बोलावून ब्रेकअप केलं. ‘द केरळ स्टोरी’चा समाजावर असा परिणाम होत आहे. त्यामुळे ते या चित्रपटावर बंदी घालू इच्छित आहेत. असं त्या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं. देवोलीनाचं हे ट्विट द्वेष आणि भीती पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर आहे.असं चाहत्यांचं म्हणणं आहे.
देवोलिना सध्या 37 वर्षांची आहे. फारच कमी वयात तिने छोट्या पडद्यावर प्रचंड कमावलं आहे. देवोलिना टीव्ही शो ‘साथ निभाना साथिया’मध्ये गोपी बहूच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली होती. तिने गेल्या वर्षी 14 डिसेंबर 2022 रोजी तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला अवघे 5 महिने झाले आहेत. देवोलीनाचा पती व्यवसायाने उद्योजक आहे.तो इंटरनेट आणि केबलशी संबंधित व्यवसाय पाहतो. तो फिटनेस ट्रेनर म्हणूनही प्रसिद्ध आहे.देवोलिना सतत आपल्या सोशल मीडियावर पतीसोबतचे सुंदर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.