JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / The Kashmir Files 2: 'द काश्मीर फाइल्स 2' येणार भेटीला; विवेक अग्निहोत्रीनीं दिली मोठी माहिती

The Kashmir Files 2: 'द काश्मीर फाइल्स 2' येणार भेटीला; विवेक अग्निहोत्रीनीं दिली मोठी माहिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट रिलीजनंतर प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटावरुन सोशल मीडियावर अनेक वाददेखील निर्माण झाले होते.

जाहिरात

विवेक अग्निहोत्री

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑक्टोबर-   ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट रिलीजनंतर प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटावरुन सोशल मीडियावर अनेक वाददेखील निर्माण झाले होते. दरम्यान या चित्रपटाच्या थरारक अनुभवानंतर प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. तत्पूर्वी दिग्दर्शकविवेक अग्निहोत्री यांनी स्वतः चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे. पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला होता. परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल, हा चित्रपट बनवण्यासाठी केवळ 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु रिलीजनंतर या चित्रपटाने जबरदस्त कामगीरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 15 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढत 340कोटींचा टप्पा पार केला होता. हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये पंडितांच झालेलं पलायन आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार यावर आधारित आहे. **(हे वाचा:** Bhedia New Poster:‘भेडिया’ मधील क्रिती सेननचा फर्स्ट लुक आला समोर; कधीही पाहिला नसेल अभिनेत्रीचा हा अवतार ) दरम्यान आता हा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. नुकतंच एक नेटकऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काश्मीरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत एका नेटकऱ्याने लिहलंय, ‘काश्मीरी पंडितांची हत्या होत आहे. स्वतःला हिंदू म्हणणारे आणि हिंदुत्वाची भूमिका घेणारं सरकार झोपेत आहे का?किंवा हत्या आणि अत्याचार यांचा सरकारला काही फरक पडत नाही का? ज्या घटना 90 च्या दशकात घडल्या होत्या. त्याच घटनांचा आजही सामना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्विटला रिट्विट करत, श्रेयांश त्रिपाठी या नेटकऱ्याने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना टॅग करत लिहलंय, ‘या घटनावर काश्मीर फाईल्स बनू शकते का? यावर आता विवेकअग्निहोत्री यांनी स्वतः उत्तर देत लिहलंय, ‘काम सुरु आहे, 2023 पर्यंत वाट पाहा’. विवेक यांचं उत्तर ऐकून लवकरच प्रेक्षकांना ‘द काश्मीर फाईल्स 2’ पाहता येणार हे नक्की झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या