JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / RaanBaazaar Trailer : रानबाजार नाही तर 'हे' होतं वेब सीरिजचं नाव, दिग्दर्शकांनी केला खुलासा

RaanBaazaar Trailer : रानबाजार नाही तर 'हे' होतं वेब सीरिजचं नाव, दिग्दर्शकांनी केला खुलासा

आजवर वेब विश्वात कधीही न पाहिलेली कथा रानबाजार (RaanBaazaar Trailer) या वेब सिरीजमधून पाहायला मिळणार आहे. तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) मुख्य भूमिकेत असलेल्या रानबाजार वेब सिरीजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शनावेळी लेखक - दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी वेब सिरीजच्या नावाविषयी महत्त्वाची माहिती दिली.

0107

अभिजीत पानसे लिखीत आणि दिग्दर्शित रानबाजार या नव्या वेब सिरीजची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. या वेब सिरीजचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

जाहिरात
0207

वेब सिरीजच्या टीझरने प्रेक्षकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. आपल्या लाडक्या अभिनेत्रींना बोल्ड अवतारात पाहून प्रेक्षकही अवाक झाले होते. आज प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चांगलाच धुमाकूळ घातला असून सिनेमाच्या ट्रेलरने काही तासात लाखो व्ह्यूज मिळवले आहेत.

जाहिरात
0307

रानबाझार या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत आहेत. दोघींच्याही धक्क करणाऱ्या अंदाजाने चाहते अवाक झालेत.

जाहिरात
0407

वेब सिरीजमध्ये उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगल, अनंत जोग, सुरेखा कुडची,वनिता खरात, माधुरी पवार, गिरीश दातार, अतुल काळे इ. कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर स्वत: दिग्दर्शक अभिजीत पानसे देखील सिरीजमध्ये अभिनय करताना दिसणार आहेत.

जाहिरात
0507

वेब सिरीजच्या पोस्टर लाँच नंतरही सिरीजच्या नावावरुन अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता. रानबाजार हे नाव अनेकांना खटकले होते. परंतु वेब सिरीजच्या नावावरुन लेखक- दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला.

जाहिरात
0607

वेब सिरीजचे नाव हे आधी **बाजार असे ठेवण्यात आले होते. परंतु नाव बदलून रानबाजार असे ठेवण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना निर्माते म्हणाले, सिरीजला हेच नाव असावे हे माझे या स्टोरीविषयीचे फर्स्ट एक्सप्रेशन होते. वेब सिरीजच्या नावावरुन कोणतीही सनसनाटी तयार करण्याचा आमचा हेतू नव्हता. हाही एक समाज असून आपल्या समाजाचा भाग आहे. मात्र तिथे आपल्याला जायचे नाही किंवा त्याकडे पाहायचे नाही. फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन हे फार क्रिएटिव्ह भाषेत असणं गरजेचं हवे असं मला वाटतं.

जाहिरात
0707

निर्माते पुढे म्हणाले, मला मराठी प्रेक्षकांवर पूर्णपणे विश्वास आहे. ते ही सिरीज पाहतील तेव्हा ते याचं फार चांगल्या प्रकारे स्वागत करतील.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या