मुंबई, 16 सप्टेंबर- मराठीतील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखलं जातं. तेजस्वीने चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोबत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात आलेले अनेक अनुभवही शेअर करत असते. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील एक सुंदर अनुभव शेअर करत. आपल्या आईला वाढदिवसानिमित्त दिलेल्या खास सरप्राईजची झलकही शेअर केली आहे. तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते. ती आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना तेजस्विनीबाबत लहान-लहान अपडेट जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टकडे लक्ष लावून असतात. तेजस्विनीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. आजसुद्धा अभिनेत्रीची एक खास पोस्ट चर्चेत आली आहे. पोस्ट वाचून सोशल मीडियावर तेजस्विनीचं प्रचंड कौतुक होत आहे. अभिनेत्रीने आपल्या आईला वाढदिवसानिमित्त दिलेली भेट सर्वांनाच प्रचंड पसंत पडत आहे. तेजस्विनी पंडित पोस्ट- ‘‘माझी आई स्वामी समर्थांची वर्षानुवर्षे भक्ती करते.नितांत प्रेम तिचं त्यांच्यावर. (मी पण स्वामींना प्रेमाने आजोबा म्हणते ) योगायोगाने आई चा वाढदिवसही जवळ आला होता. वाटलं बाकी वेगळं काहीतरी देण्यापेक्षा तिला स्वामींची सुबक मूर्ती द्यावी. माझा शोध सुरू झाला. आणि मग अनेक अनुभव येऊ लागले.एका गुरुवारी अचानक भावाने स्वामींची अक्कलकोट हून आणलेली फोटो फ्रेम दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या ओळखीतल्या गुरुजींनी संक्षिप्त गुरूचरित्र दिले, असे अनेक अनुभव येऊ लागले ‘डोळ्यात भरेल’ अशी मूर्ती शोधत होते (बस हीच असं वाटणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ) अनेकांनी शोधायला मदत ही केली… मग शेवटी ते म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीच होत नाही. Instagram scroll करताना स्वामी भक्त केदार शिंदे दादाच्या एका फोटो मधली मूर्ती पाहिली आणि लगेच त्याला फोन केला….ही मूर्ती कुठून घेतलीस…त्वरित फोन वर एक नंबर त्याने पाठवला स्वामी आर्ट्सच्या विश्वंभर साळसकर ह्यांचा…त्यांच्याकडे एक से एक मूर्त्या पाहायला मिळाल्या…
**(हे वाचा:** Milind Gawali : ‘त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि…’; मिलिंद गवळींनी शेअर केला पडद्यामागचा ‘तो’ किस्सा ) कलाकार हा फक्त मूर्ती बनवत नाही तर त्याच्यात जीव भरतो, ह्यावर ठाम विश्वास बसला… स्वामींचं हे रूप पाहिल्यावर एक क्षणही न दवडता मी आजोबांना घरी या अशी विनंती केली. आणि मनात अनन्य श्रद्धा असणार्या कोणालाच स्वामी नाराज करत नाहीत. अखेर आईच्या वाढदिवसाला आजोबांनी विनंती ऐकली आणि घरी आले.प्रचंडं ऊर्जा देतात ते आम्हाला. रोज आमच्याकडे बघतात आणि म्हणतात, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"ता क : आजही गुरुवारंच.’’