JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माय पार्टनर..' म्हणत तेजश्री प्रधानने शेअर केला फोटो, खास पोस्टची रंगलेय चर्चा !

'माय पार्टनर..' म्हणत तेजश्री प्रधानने शेअर केला फोटो, खास पोस्टची रंगलेय चर्चा !

‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्याची जोडी कायमच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली. मालिका संपूनदेखील ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 डिसेंबर- ‘अग्गंबाई सासुबाई’ या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्याची जोडी कायमच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली. मालिका संपूनदेखील ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते. यावेळी मात्र शुभ्रा आणि बबड्या या रील लाइफ जोडीपेक्षा तेजश्री प्रधान (tejashree pradhan) आणि आशुतोष पत्की या रिअल लाइफ जोडीचीच जास्त चर्चा आहे. कारण तेजश्री प्रधानने आशुतोष पत्कीच्या**( ashutosh patki birthday** ) वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे या दोघांची जोडी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तेजश्री प्रधानने आशुतोष पत्की सोबतचा एक फोटो पोस्ट करत म्हटले आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या कामातील पार्टनर….क्राईमधील पार्टनर….क्रिएटिव्हीटी….फाईट..लाफटर…गॉसिप..जवळ जवळ सर्वच चांगल्या वाईट गोष्टींमध्ये तू माझा पार्टनर आहेस. तेजश्रीच्या या पोस्टनंतर आशुतोष पत्कीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- ‘छोटे उस्ताद’ चा तो Video पाहून अभिनेत्री म्हणतेय मराठी शाळा बंद करा! तेजश्रीच्या वाढदिवशीही आशुतोषने तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावरवर शेअर केला होता. तो इतका व्हायरल झाला की चाहत्यांनी या दोन कलाकारांमध्ये अफेअर असल्याची चर्चा सुरु केली. त्यातही आशुतोषनं तेजश्रीला तिचा भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा सल्ला दिल्यानं ही चर्चा आणखीच वाढली. पण तेजश्रीने याविषयी बोलताना एका मुलाखतीमध्ये सांगतिले होते की, आमच्या दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री आहे. आशुतोष माझा खूपच जवळचा मित्र आहे आणि म्हणूनच त्याने तो फोटो माझ्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केला होता.

संबंधित बातम्या

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेच्या सुरुवातीपासूनच येणारी रंजक वळणं प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यास यशस्वी ठरत आहेत. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे.या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकतीच एंट्री झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या