जेठालाल आणि बबिताची कशी झाली होती मैत्री? पाहा या लोकप्रिय कलाकारांचा अनोखा प्रवास
'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Oolta Chashmah) या मालिकेतून अनेक वर्षे प्रेश्रकांच मनोरंजन करणारी अभिनेत्री मुनमून दत्त (Moonmoon Dutta) म्हणजेच मालिकेतील बबिताजी आणि जेठालाल ही जोडगोळी प्रेक्षकाना फार भावते. प हे दोघे मालिकेआधीही एकत्र काम करत होते, पहा काय आहे मूनमुन दत्तचा अभिनय प्रवास.
तारक मेहता... या मालिकेतील मुनमूनची आणि जेठालालची केमिस्ट्री ही प्रत्रक फार पसंत करतात. पण या मालिकेआधीही ते एकत्र काम करत होते.
मुनमून ही तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
मुनमूनचा जन्म हा पश्चिम बंगाल मध्ये झाला होता. पण कालांतराने ती पुण्यात आली. तर तिने मॉडेलिंग ही केलं होतं.
2004 साली बबिता म्हणजेच मुनमून ने 'बम सब बाराती' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होत. विशेष म्हणजे जेठालाल , अभिनेते दिलीप जोशीही मुनमून सोबत या मालिकेत काम करत होते.
इतकचं नव्हे कर दिलीप यांनीच मुनमूनला तारक मेहता... मधील बबिता या रोल विषयी सांगितलं होतं. त्यानंतर बबिताची मालितकेत एन्ट्री झाली.
मुनमून ही 'तारक मेहता...' मालिकेच्या सुरूवातीपासूनच.मालिकेत काम करत आहे. 2008 साली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.