अभिनेता सिद्धार्थ जाधव ( sidharth jadhav Divorce) काही दिवसांपासून त्याच्या घटस्फोटांच्या बातमीमुळे चर्चेत आला होता. पत्नी तृप्ती अक्कलवारपासून (trupti akkalwar ) सिद्धार्थ मागच्या दोन वर्षांपासून वेगळा राहतो असं म्हटलं जातं होतं. मात्र सिद्धार्थनं यावरचं मौन सोडून आमच्यात सगळं काही ठिक असल्याचं सांगितलं होतं. या चर्चांना पूर्णविराम देत सिद्धार्थ आणि तृप्ती यांनी लेकीचा वाढदिवस साजरा केला. दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार यांच्या नात्यात दुरावा आला असून त्याचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
परंतू सिद्धार्थ जाधवनं घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम देत 'आमच्यात सगळं ठिक' असल्याचं सांगितलं.
सिद्धार्थनं दिलेल्या स्पष्टिकरणानंतरही त्याच्या चाहत्यांचा यावर विश्वास बसत नव्हता. कारण गेली दोन वर्ष सिद्धार्थनं बायकोबरोबरची एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नव्हती.
मात्र नुकताच सिद्धार्थची मोठी लेक स्वराचा वाढदिवस झाला. स्वराचा वाढदिवस सिद्धार्थ आणि तृप्ती मिळून सेलिब्रेट करताना दिसले.
सिद्धार्थनं मागील दोन वर्ष पत्नी तृप्तीबरोबर एकही फोटो शेअर केला नव्हता. सिद्धार्थ लेक स्वरा आणि इरा यांच्याबरोबरचेच फोटो कायम शेअर करत होता.
नुकताच सिद्धार्थ संपूर्ण कुटुंबाबरोबर दुबई ट्रिपला गेला होता. तिथेही त्यानं केवळ मुलींबरोबरचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र सिद्धार्थ फक्त मुलींबरोबर नाही तर पत्नी तृप्तीही त्याच्याबरोबर होती. तृप्तीनंही तिच्या सोशल मीडियावर दुबई ट्रिपचे काही फोटो शेअर केलेत.
स्वराच्या वाढदिवसाचा तृप्तीबरोबरचा फोटो शेअर करुन अखेर सिद्धार्थनं त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.