JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Tamannaah Bhatia : आलिया भट्टच्या 'डार्लिंग' हिरोला डेट करतीये तमन्ना भाटिया; किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Tamannaah Bhatia : आलिया भट्टच्या 'डार्लिंग' हिरोला डेट करतीये तमन्ना भाटिया; किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

नुकतंच प्रसिद्ध बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाने सुद्धा नववर्ष साजरं केलं. पण ज्याच्यासोबत साजरं केलं त्याची चर्चा होतेय. तमन्नाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला किस करताना दिसत आहे.

जाहिरात

तमन्ना भाटिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जानेवारी:  2023 हे वर्ष नुकतच सुरु झालं आहे. बॉलिवूडचे कलाकार विविध ठिकाणी नवीन वर्षाचा आनंद घेताना दिसत आहेत. कोणी आपल्या बायको, नवऱ्यासोबत गेलंय  तर कोणी कथित बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत नवीन वर्ष साजरे करताना दिसले. नुकतंच प्रसिद्ध बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाने सुद्धा नववर्ष साजरं केलं. पण ज्यांच्यासोबत साजरं केलं त्याची चर्चा होतेय. तमन्नाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला किस करताना दिसत आहे. तमन्ना भाटीया आलिया भट्टच्या डार्लिंग फेम अभिनेता विजय शर्मा सोबत गोव्यात वेळ घालवताना दिसली. नवं वर्षाच्या स्वागतासाठी हे दोघं गोव्यात क्वालीटी टाईम घालवण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. तमन्ना आणि विजय नवीन वर्षाचे स्वागत करताना एकमेकांसोबत डान्स करताना दिसले. यावेळी फक्त चर्चा सुरु नाही तर त्यांच्या चाहत्यांनी त्या दोघांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हेही वाचा - Tunisha Sharma : ‘अम्मा तुम्ही माझ्यासाठी…’ तुनिषाचा शिझानच्या आईसोबत तो फोनकॉल आला समोर तमन्नानं यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर विजयनं पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. दरम्यान, गोव्यातील व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तमन्ना आणि विजय किस करताना दिसत आहेत. तमन्नाला विजयसोबत पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘हे कधी झालं.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ही लस्ट स्टोरी नाही लव्ह स्टोरी आहे.’ तमन्ना आणि विजयसोबत या पार्टीतून अनेक चाहत्यांनी फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या

तमन्ना आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. हे पहिल्यांदा नाही जेव्हा हे दोघे एकत्र दिसले. याआधी देखील या दोघांना दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र पाहिले होते.

तमन्ना आणि विजय अनेकदा विमानतळावर एकत्र दिसले होते. पण या जोडप्याने कधीही मीडियासमोर त्यांच्या नात्याबद्दल बोलले नाही. पण आता त्यांचा किसिंग व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रेमाची संपूर्ण कहाणी न सांगता ऐकली आहे. ही जोडी लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये एकत्र दिसणार आहे. आता हा व्हिडीओ या दोघांच्या येणाऱ्या सीरिजच्या प्रमोशनसाठी आहे कि दोघे खरंच  एकमेकांच्या प्रेमात आहेत हे येणाऱ्या काळातच समजेल. पण सध्यातरी तमानांचे चाहते तिच्यासाठी खुश आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या