JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Taarak Mehta ..फेम 'दयाबेन' दुसऱ्यांदा बनणार आई! बेबी बम्पसह फोटो झाला VIRAL

Taarak Mehta ..फेम 'दयाबेन' दुसऱ्यांदा बनणार आई! बेबी बम्पसह फोटो झाला VIRAL

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे. घरातील लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील लोकांना ही मालिका पाहायला आवडते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 डिसेंबर-   ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’   (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah)   गेल्या 13 वर्षांपासून लोकांचं मनोरंजन करत आहे. घरातील लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील लोकांना ही मालिका पाहायला आवडते. मालिकेतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मालिका ही सोडली आहे. आणि त्यांच्या जागी नवीन कलाकार आले आहेत. परंतु शोमध्ये एक पात्र असं आहे, ज्याची जागा बर्‍याच दिवसांपासून रिक्त आहे आणि मालिकेमध्ये तिची जागा अद्याप कोणीही घेतलेली नाही. मालिकेमधील त्या पात्राचे नाव ‘दयाबेन’ आहे.चाहते तिच्या परतण्याची वाट पाहात आहेत. परंतु, पुन्हा एकदा दयाबेन   (Dayaben)   म्हणजेच दिशा वकानी  (Disha Vakani)  आई होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वकानी सोशल मीडियावर सक्रिय नाही. परंतु तिचे अनेक फॅन पेज आहेत. या पेजवर फॅन अनेकदा दिशाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच सोशल मीडियावर दिशाचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्याला पाहून चाहत्यांनी अंदाज लावला आहे की दिशा वकानी दुसऱ्यांदा आई बनणार आहे.

संबंधित बातम्या

या व्हायरल फोटोमध्ये दिशा वकानी तिच्या पतीसोबत दिसून येत आहे. हा फोटो तिच्या एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासारखा दिसत आहे. या फोटोमध्ये दयाबेनचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्यामुळे ती पुन्हा आई होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र दिशा वकानीने याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे या फोटोमागे किती तथ्य आहे, हे सांगणं कठीण आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि सोशल मीडियावर दयाबेन दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे. (हे वाचा: Taarak Mehta…फेम भिडे मास्टरच्या सोनूने सांगितलं आपल्या बॉयफ्रेंडचं नाव ) चाहते ही बातमी खरी मानत आहेत. कारण नुकतंच या शोमध्ये दयाबेनचा नवरा जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या मुलीचं लग्न झालं होतं. या लग्नाला तारक मेहताच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.परंतु खाजगी कारणामुळे दिशा उपस्थित राहिली नव्हती. त्यामुळे लोकांचा असा विश्वास आहे की याच कारणामुळे ती लग्नाला आली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या