मुंबई, 31 मे : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे सध्या मुंबईमध्ये अडकलेली अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तापसीच्या आजीचं निधन झालं आहे. याची माहिती तापसीनं स्वतःच एका सोशल मीडिया पोस्टमधून दिली. एक फोटो शेअर करत तापसीनं आपलं दुःख व्यक्त केलं. या पोस्टमध्ये आजीच्या जाण्यानं त्यांच्या आयुष्यात कशी पोकळी निर्माण झाली आहे हे तापसीनं सांगितलं. तिच्या या पोस्टवर कमेंट करुन अनेकांनी तिचं सांत्वन केलं आहे. तापसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात गुरुद्वारामध्ये पूजा स्थळाच्या अगदी जवळ तापसीच्या आजीचा फोटो ठेवण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना तापसीनं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, आज आजीनं जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्यानं आमच्या आयुष्यात एक रितेपणा आला आहे. आजी तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील. तापसीच्या या इमोशनल पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.
तापसी लॉकडाऊनमुळे सध्या मुंबईमध्येच अडकली आहे. ती या ठिकाणी तिच्या बहिणीसोबत राहत आहे आणि अशा परिस्थितीत ती आपल्या आजीच्या अंत्यदर्शनालाही जाऊ शकली नाही. तापसीचं तिच्या आजीशी खूप खास बॉन्डिंग होतं. त्यामुळे आजीच्या जाण्यानं ती मानसिक धक्का बसला आहे तापसी सध्या बाकीच्या बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे आपल्या घरात बंद आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या पर्सनल लाइफबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. तिनं पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की, तिला कोणतीच गोष्ट लपवायची नाही. तिच्या लाइफमध्ये कोणतरी खास व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची तिला खूप अभिमान वाटतो.