JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Swara Bhasker: 'जर तिला एक हजार पुरुषांसोबत रात्र...', अयोध्यातील महंतांच अभिनेत्रीबाबत संतापजनक वक्तव्य

Swara Bhasker: 'जर तिला एक हजार पुरुषांसोबत रात्र...', अयोध्यातील महंतांच अभिनेत्रीबाबत संतापजनक वक्तव्य

Swara Bhasker Fahad Ahmad Wedding: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून आपल्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्करनं समाजवादी पक्षातील युवा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यामुळे ती अनेक हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आली आहे.

जाहिरात

स्वरा भास्कर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून आपल्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्करनं समाजवादी पक्षातील युवा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं आहे. त्यामुळे ती अनेक हिंदुत्ववादी आणि मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आली आहे. अनेक हिंदू धार्मिक नेत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी स्वरावर जोरदार टीका करत तिची तुलना श्रद्धा वालकर या खून झालेल्या हिंदू तरुणीशी केली होती. आता, आयोध्येतील महंत राजू दास यांचाही टीकाकारांमध्ये समावेश झाला आहे. मुस्लिम मुलाशी लग्न केल्याप्रकरणी त्यांनी स्वराला अल्टिमेटम दिला आहे. राजू दास असंही म्हणाले की, स्वरा भास्कर जर एक सशक्त महिला असती तर तिनं हे लग्न केलंच नसतं. शिवाय त्यांनी तिच्याबद्दल इतर काही आक्षेपार्ह वक्तव्यंही केली आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. राजू दास म्हणाले, “जर तिला एक हजार पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल तर त्यासाठी तिचं अभिनंदन. कारण तिनं अशा समाजातील मुलाशी लग्न केलं आहे जिथे भाऊ-बहिणी एकमेकांशी लग्न करतात आणि नंतर तलाक, तलाक, तलाक म्हणत सहज वेगळे होतात”. (हे वाचा: ‘जे श्रद्धासोबत झालं ते…’ साध्वी प्राचीने स्वरा भास्करला आफताब प्रकरणाची करून दिली आठवण ) “स्वरा भास्करनं उघडपणे इन्शा अल्लाह आणि भारत तेरे टुकडे होंगे, असं म्हटलेलं आहे. 10 दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीला ती ‘भाई’ म्हणाली होती आणि त्याला लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला होता, त्याच व्यक्तीशी तिनं आता लग्न केलं आहे,” असंही महंत दास म्हणाले. या पूर्वी, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी स्वराबद्दल म्हटलं होतं, “स्वरा भास्कर नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात असल्याचं दिसलं आहे. मला खात्री होती की, ती नक्कीच आंतरधर्मीय लग्न करेल आणि तिने तेच केलं आहे. तिनं एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं आहे. कदाचित स्वरानं, आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे कसे केले, या बातमीकडे लक्ष दिलेलं नाही. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तिने एकदा फ्रीज बघायला हवा होता. ही तिची वैयक्तिक निवड आहे. मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. पण, जे श्रद्धासोबत झाले ते स्वरासोबतही घडू शकतं.” 16 फेब्रुवारी रोजी, स्वरा भास्करनं फहाद अहमदशी साखरपुडा केल्याची घोषणा केली. स्वरा आणि फहाद यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्नही केलं. या कायद्यामुळे भारतीय नागरिकांना धर्मांतर न करता आंतरधर्मीय लग्न करण्याची परवानगी मिळते. मात्र, इस्लामिक धार्मिक विद्वानांनी शरिया कायद्यांतर्गत स्वरा-फहादच्या लग्नाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. स्वरानं इस्लाम स्वीकारलेला नाही यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू झाले आहेत.

स्वरा भास्करचा पती फहादनं या पूर्वीच ‘भाई’ ट्विटमुळे झालेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. “किमान ‘संघी’ लोकांनी, हिंदू आणि मुस्लिम भाऊ-बहीण असू शकतात हे तरी स्वीकारलं आहे,” असं तो म्हणाला आहे. फहादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विटमध्ये स्वरानं फहादचा ‘भाई’ असा उल्लेख केला होता आणि त्याला लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला होता. हा पती-पत्नीमधील विनोद होता, असंही फहादनं स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या