JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी दणका! स्वप्नील जोशीच्या मॅजिकसमोर तापसी पन्नूही पडली फिकी

मराठी दणका! स्वप्नील जोशीच्या मॅजिकसमोर तापसी पन्नूही पडली फिकी

‘मोगरा फुलला’ या सिनेमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाचे समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून- आई-मुलाचेप्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणाराएक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ सिनेमा  १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे १६ जून रोजी भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यानही या सिनेमाने बॉक्स ऑफिवर समाधानकारक कमाई केली. ‘मोगरा फुलला’ या सिनेमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाचे समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले आहे. मुंबई, पुणे, ठाण्यात या सिनेमाचं कलेक्शन सर्वाधिक असून इतर अन्य जिल्ह्यांमध्ये सिनेमाचं कलेक्शन समाधानकारक आहेत. सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मोगरा फुलला सिनेमाच्या कलेक्शनची माहिती दिली. सिनेमाने प्रदर्शनाच्या दिवशी अर्थात शुक्रवारी ३७.५ लाख इतकी कमाई केली त्यानंतर दुसऱ्या शनिवार १५ जुन रोजी ५६.२ लाख तर १६ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगात सामना असूनदेखील तिसऱ्या दिवशी ५१.५ लाख इतकी कमाई केली आतापर्यंत चित्रपटाने एकूण पहिल्या तीन दिवसात १ करोड ४५ लाख इतकी कमाई केली आहे . त्याचबरोबर प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद बघून मोगरा फुलला सिनेमाच्या शोमध्ये वाढ करण्यात आली आहे. हेही वाचा- …म्हणून तब्बल 16 वर्ष हा सुपरस्टार शाहरुख खानशी एक शब्दही बोलला नाही

हेही वाचा-  VIDEO: Aamir Khan सोबत मुलगी इराने केलं असं काही की तो झोपू शकला नाही दरम्यान, तापसीच्या ‘गेम ओव्हर’ सिनेमाही स्वप्निलच्या सिनेमासोबतच प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने शुक्रवारी ३८ लाख, शनिवारी ८८ लाख व रविवारी ७४ लाख रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे तापसीचा गेम ओव्हर हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला असूनही तीन दिवसांमध्ये या सिनेमाने जेमतेम ४.९५ कोटी रुपये कमावले आहेत.

जाहिरात

दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी देवधर यांचे बऱ्याच कालावधीनंतर झालेले पुनरागमन, आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याचा वेगळ्या लुकमधील नायकसुमधुर संगीत आणि  ‘जीसिम्स’  सारख्या  दर्जेदार बॅनरची निर्मिती यांमुळे चित्रपटाबद्दल असलेली उत्कंठा कसोटीवर अगदी पुरेपूर उतरल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे.  ‘नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेला ‘मोगरा फुलला’ स्वप्नील जोशीसई देवधरनीना कुळकर्णी,चंद्रकांत कुलकर्णीआनंद इंगळेसंदीप पाठक आदींच्या दमदार अभिनयाने नटला आहे. हेही वाचा- भाच्याच्या बर्थडेमध्ये सलमान खानने केला स्टंट, हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच

जाहिरात

नीना कुलकर्णी यांच्या रूपाने बऱ्याच काळाने पडद्यावर एक हृदयाला भिडणारी आई रसिकांना पाहायला मिळतेतर दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नीलच्या काकाच्या भूमिकेत वेगळी छाप पाडून जातात. अशा अनेक हळुवार नात्यांची ‘पैशांनी श्रीमंत होणं सोप्पं,नात्यांनी समृद्ध होणं कठीण’ या टॅगलाइनमधील गुंफण प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवता येते.   VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या