स्वप्नील जोशी
मुंबई, 4 डिसेंबर : मराठीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी . अभिनेता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करत स्वप्निल नेहमीच चाहत्यांसोबत संपर्कात असतो. अशातच कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली स्वप्निल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो एक एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला असून त्याचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वप्निल जोशीने झोमॅटो कंपनीच्या अॅपबद्दल तक्रार करत एक ट्टिव शेअर केलं होतं. या ट्विटमध्ये स्वप्निलनं लिहिलं, झोमॅटो अॅप चालतंय का? मला प्रॉब्लेम येत आहे. हे ट्विट करत त्याने झोमॅटोलाही टॅग केलं होतं. त्यानंतर काही वेळातच त्याने पुन्हा ट्विट करत अॅप सुरु झाल्याची माहिती दिली. स्वप्निलचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आणि सोबत याची जोरदार चर्चाही रंगली.
स्वप्निल जोशीच्या ट्विटवा प्रतिक्रिया देताना झोमॅटो कंपनीने लिहिलं, ‘हॅलो स्वप्निल, आमच्या अॅप मध्ये काही तात्पुरत्या स्वरुपाचा तांत्रिक बिघाड झाला होता. पण आमच्या टेकच्या मित्रांचे धन्यवाद कारण त्यांनी वेळीच यावर उपाय शोधला. यादरम्यान तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि भविष्यात तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्याची आशा आहे’.
दरम्यान, स्वप्नीलने बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरु केली होती. एवढ्या वर्षात त्याने विविधांगी भूमिका केल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेची आणि दमदार अभिनयाची कायमच प्रशंसा झाली आहे. स्वप्नील जोशीचे मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी, मितवा, प्यार वाली लव्हस्टोरी हे सिनेमे खूपच गाजले. यासोबत समांतर या वेबसिरीजमध्ये त्याने केलेली गंभीर भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक झालं. सध्या तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तो सौरभची भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षक पसंत करतात. या मालिकेत तो अभिनेत्री शिल्पा तुळसकरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतो. मालिकेतील दोघांते अनेक क्षण व्हायरल होत असतात.