JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वप्नील जोशीची रामानंद सागर यांच्याशी अशी झाली होती पहिली भेट! वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं

स्वप्नील जोशीची रामानंद सागर यांच्याशी अशी झाली होती पहिली भेट! वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं

रामायणात कुशची भूमिका मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनं साकारली होती. नुकतच स्वप्नीलनं त्याच्या आणि रामानंद सागर यांच्या पहिल्या भेटीबद्दलचा अनुभव शेअर केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 मे : कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झालेला पाहायला मिळत आहे. शूटिंग बंद झाल्यानं टीव्हीवर नवे कोणतेही शो उपलब्ध नसल्यानं एकेकाळचे लोकप्रिय ठरलेले रामायण आणि महाभारत हे शो पुन्हा एकदा टेलिकास्ट करण्यात आले. सध्या टीव्हीवर रामायणानंतर उत्तर रामायण टेलिकास्ट होत आहे आणि सर्वांनाच माहित आहे की रामायणात कुशची भूमिका मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीनं साकारली होती. नुकतच स्वप्नीलनं त्याच्या आणि रामानंद सागर यांच्या पहिल्या भेटीबद्दलचा अनुभव शेअर केला. स्वप्नील त्याचं युट्यूब चॅनल पिल्लू टीव्हीवर त्याच्या ‘रामायण’ शूटिंगच्या वेळचे किस्से शेअर करत आहे. नुकताच त्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात त्यानं त्याच्या आणि रामानंद सागर याच्या पहिल्या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. स्वप्नील पहिल्यांदा रामानंद सागर यांना मढ आयर्लंडवर भेटला होता. ज्यावेळी आजूबाजूला काय चाललं आहे आणि स्वतः रामानंद सागर कोण आहेत हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. मात्र त्याच्या वडीलांना मात्र या भेटीनंतर एवढं भरून आलं की त्यांनी त्याला या भेटीनंतर आइसक्रिम खाऊ घातलं होतं. ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकला नाही मुलगा रणबीर

स्वप्नील जोशीनं वयाच्या 9 व्या वर्षी उत्तर रामायणात काम केलं होतं आणि यात त्यानं कुशची भूमिका साकारली होती. मात्र त्यावेळी देशभरातून अनेक मुलांच्या ऑडिशन घेण्यात आल्या होत्या त्यामुळे हे स्वप्नीलसाठी कठीण काम होतं. सध्या डीडी नॅशनलवर उत्तर रामायण सुरू आहे. ज्यातील स्वप्नीलच्या त्यावेळच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जात आहे.

रामायणातील इतर भूमिकांप्रमाणेच सध्या सोशल मीडियावर लव-कुश यांची भूमिका साकारणाऱ्या बालकारांचीही सध्या बरीच चर्चा आहे. लव-कुश यांच्या भूमिका त्यावेळी स्वप्नील जोशी आणि मयुरेश क्षेत्रमाडे यांनी साकारल्या होत्या. यात स्वप्नील कुशच्या भूमिकेत दिसला होता आणि आज एवढया वर्षांनंतर स्वप्नील मराठी सिने इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध चेहरा बनला आहे. (संपादन- मेघा जेठे. ) ऋषी कपूर-इरफान खाननंतर बॉलिवूडला आणखी एक धक्का, या प्रसिद्ध व्यक्तीचं झालं निधन बिपाशा बासूनं शेअर केले लग्नातले पतीसोबतचे रोमँटिक क्षण, पाहा UNSEEN VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या