JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुयश टिळकचा तो व्हिडिओ पाहून चाहत्याच्या डोळ्यात आलं पाणी, अभिनेत्याचं होतयं कौतुक

सुयश टिळकचा तो व्हिडिओ पाहून चाहत्याच्या डोळ्यात आलं पाणी, अभिनेत्याचं होतयं कौतुक

झी मराठीवरच्या ‘लोकमान्य’ या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेत काही दिवसापूर्वी अभिनेता सुयस टिळक याची एंट्री केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी- झी मराठीवरच्या ‘लोकमान्य’ या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेत काही दिवसापूर्वी अभिनेता सुयस टिळक याची एंट्री केली आहे. मालिकेत सुयश टिळक क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका साकारताना दिसत आहे.सुयश पहिल्यांदाच अशा धाटणीची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याने साकारलेली वासुदेव बळवंत फडके यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करायला यशस्वी झाली आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. एक अभिनेत्यासाठी याहून मोठं काहीच नाही. सुयशनं नुकताच या मालिकेतील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. चाहत्यांनी भल्यामोठ्या कमेंट करत सुयशचे कौतुक केलं आहे.एका चाहत्यांने म्हटलं आहे की, सुयश दादा आजचा आणि कालचा एपिसोड खरच खूप छान होता . वासुदेव बळवंत फडके ना बघताना डोळ्यात पाणी आलं. आजपर्यंत बघितलेल्या तुझ्या भूमिकांमध्ये ही भूमिका सगळ्यात वरचड होती सगळ्यात भारी होती. असं वाटतं होतं की प्रत्यक्ष वासुदेव फडके ना बघतोय ते म्हणतात ना नट भूमिकेला निवडत नाही तर भूमिका नटाला निवडते याची प्रचिती आली तु साकारलेले वासुदेव फडके कायम आमच्या सम्रणात राहतील . मनापासून धन्यवाद दादा वासुदेव फडके काय होते हे आज तुझ्यामुळे कळले.hats off you Dada 😊😊 @suyashtlk.

संबंधित बातम्या

दुसऱ्या एका चाहत्यांने म्हटलं आहे की,सुयश दादा तुझी वासुदेव बळवंत फडके ची भूमिका अप्रतिम साकारली आज वर खूप भूमिका केल्या पण ही भूमिका करत असताना असा वाटलं नाही तु सुयस दादा म्हणून तुला आमच्या घरचे खरो खर वासुदेव बळवंत फडके डोळ्या समोर आहेत अस वाटत होतं .😍 तर आणखी एका चाहत्याने म्हटलं आहे की, सुयश दादा कालचा आणि आजचा एपिसोड बघितल्यावर मी खूप भावूक झालो होतो, अप्रतिम साकारली आहेस तू वासुदेव बळवंत फडके यांची , उत्तम डायलॉग, डोळ्यात पाणी आले….अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी केल्या आहेत. सुयशच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आलं आहे. का रे दुरावा या मालिकेतून छोट्या पडदयावर आगमन केलं. त्यानंतर बाप माणूस, शुभमंगल ऑनलाइन या मालिकेतही सुयशने चाहत्यांची मनं जिंकली.

सुय़श टिळक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याचे विविध फोटो व्हिडिओ तो चाहत्यांच्यासोबत शेअर करत असतो. विशेष करून त्याच्या पत्नीसोबत तो भन्नाय रील्स शेअर करत असतो. मागच्या काही दिवसांपासून तो छोट्या पडद्यापासून लांब होता. पण आता त्याने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडं मोर्चा वळवला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या