JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Taali First Look: सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत; समोर आला 'ताली'चा फर्स्ट लुक

Taali First Look: सुष्मिता सेन दिसणार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत; समोर आला 'ताली'चा फर्स्ट लुक

सध्या सर्वत्र ओटीटीची चलती आहे. अनेक मोठमोठे कलाकार ओटीटीवर पदार्पण करत आहेत. दरम्यान सुष्मिता सेन ‘आर्या’ या वेबसीरीजच्या तुफान यशानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे

जाहिरात

सुष्मिता सेन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 ऑक्टोबर-  सध्या सर्वत्र ओटीटीची चलती आहे. अनेक मोठमोठे कलाकार ओटीटीवर पदार्पण करत आहेत. दरम्यान सुष्मिता सेन ‘आर्या’ या वेबसीरीजच्या तुफान यशानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्रीचा आगामी वेबसीरिजमधील सुपर इंटेन्स लुक पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या सीरिजचा फर्स्ट लुक नुकतंच रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपलं कलाकौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. सुष्मिताने यामध्ये साडी नेसलेली असून, कपाळावर मोठा टिळा लावलेला आहे. अभिनेत्रीचा लुक पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष लागून असतं. दरम्यान सुष्मिता सेनने आपल्या आगामी ‘ताली’ वेबसीरिजचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या सीरिजमधील तिच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘टाळी वाजवणार नाही, वाजवायला लावणार! श्री गौरी शिंदे-सावंतच्या भूमिकेत फर्स्ट लुक. या सुंदर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारण्याचा आणि तिची कथा जगासमोर आणण्याचा बहुमान मिळण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानास्पद आणि कृतज्ञतेचं असं दुसरं काहीच नाहीय. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे’. सुष्मिता सेनचा हा लुक समोर येताच चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. अभिनेत्रीला या दमदार भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चाहत्यांनी फर्स्ट लुकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यामध्ये अनेकांनी कमेंट्स करत जबरदस्त लुक म्हणत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. तर एकाने ट्रान्सजेंडरची बाजू घेत म्हटलंय, ‘मला वाटतं की, अभिनेत्रींनीं ट्रांसवुमनची भूमिका साकारण्यापेक्षा एखाद्या ट्रान्सजेंडरलाच ही भूमिका साकारण्याची संधी मिळायला हवी’.

संबंधित बातम्या

**(हे वाचा:** Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने खरेदी केलं आलिशान घर; किंमत वाचून बसणार नाही विश्वास ) सुष्मिता सेनने आजपर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. परंतु ही भूमिका फारच जबरदस्त आहे. अभिनेत्रीला या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

या सीरिजमध्ये सुष्मिता सेन ट्रांसवूमेन गौरी शिंदेच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये गौरीच्या आयुष्यातील अनेक महत्वाची गोष्टींवर नजर टाकली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 6 एपिसोडमध्ये ही सीरिज प्रसारित केली जाणार आहे. सध्या सुष्मिताचा हा लुक प्रचंड चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या