मुंबई, 26 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आता आपल्यात नाही, यावर त्याच्या चाहत्यांचा अजून विश्वास बसत नाही आहे. त्याच्या मृत्यूच्या 12 दिवसांनंतर देखील सोशल मीडियावर त्याच नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने दिसत आहेत. त्याचे फॅन्स त्याला जमेल त्या मार्गाने श्रद्धांजली अर्पण करत आहेत. काहींना त्याचे जुने व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. असे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. दरम्यान सुशांतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुशांतच्या त्याच्या जीवन मंत्राबद्दल बोलत आहे. जो त्याला त्याचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी सांगितला होता. सुशांत सिंह राजपूत त्याच्या घरामध्ये सर्वात लहान होता. चार बहिणींचा भाऊ असलेल्या सुशांतले कमी वयातच प्रसिद्धी मिळवली होती. त्याने स्वत:च्या मेहनतीने टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास केला होता. एकदा त्याने त्याचा चित्रपट ‘केदारनाथ’च्या प्रमोशन दरम्यान एक गोष्ट सांगितली होती की तो त्याच्या वडिलांकडून काय शिकला आहे. सुशांतचा हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये सुशांत म्हणतोय की, ‘मी खूप काही माझ्या आईकडून शिकलो आहे, मात्र आपण खूप काही शिकू शकतो हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे.’ सुशांतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
सुशांतचा हा व्हि़डीओ पाहून अनेक फॅन्स भावूक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या घरी शोकसभा होती. त्यादिवशीचा सुशांतच्या वडिलांचा फोटो देखील काळजात चरर्र करून जातो. अवघ्या 34 व्या वर्षी सुशांत जग सोडून गेल्याने त्यांचे दु:ख अनालकलनीय आहे. दरम्यान सुशांतच्या शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. 24 जुलै रोजी Disney Plus Hotstar वर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र यावरून सुशांतच्या चाहत्यांनी अशी मागणी केली आहे की, सुशांतचा हा चित्रपट शेवटचा असल्याने तो ऑनलाइन न प्रदर्शित करता सिनेमा गृहांमध्ये प्रदर्शित व्हावा.