मुंबई, 14 जून : सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करत आपल्या जीवनयात्रेला पूर्णविराम दिला. बॉलिवूडमधील अनेक चांगल्या सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सुशांतच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. सुशांतची टीमही त्याच्या अकाली मृत्यूने दु:खाच्या महासागरात बुडाली आहे. यातच त्याच्या टीमकडून अधिकृतरित्या एक स्टेटमेंट देत आवाहन करण्यात आलं आहे. ‘सुशांत सिंह राजपूत आपल्यात राहिला नसल्याचं सांगताना मोठं दु:ख होत आहे. पण आम्ही आपल्याला आवाहन करतो की, त्याच्या स्मृती कायम तुच्यासोबत राहू द्या. त्याने केलेलं काम आणि त्याचं आयुष्य सेलिब्रेट करा,’ असं आवाहन सुशांतच्या टीमकडून त्याच्या चाहत्यांना करण्यात आलं आहे. सुशांतच्या टीमने माध्यमांना एक विनंती केली आहे. ‘या दु:खाच्या क्षणी प्रायव्हसी राखण्यासाठी आम्हाला मदत करा,’ असं टीम सुशांतने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. बिहार ते बॉलिवूड…कसा होता सुशांतचा प्रवास? सुशांत सिंह हा मूळचा बिहारचा असून काही दिवसांपूर्वी तो आपल्या वडिलोपार्जित घरीही आला होता. तो मूळचा पूर्णियामधील बधारा कोठी येथील मालडीहाचा रहिवासी होता आणि शेवटच्या वेळी जेव्हा त्याने आपल्या गावाला भेट दिली तेव्हा त्याने कौटुंबिक कार्यक्रमातही भाग घेतला होता. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल अजूनही बिहारच्या लोकांना विश्वास वाटत नाही. खरं तर, शेवटच्या वेळी जेव्हा तो बिहारला आला तेव्हा ते त्याच्या वडिलांच्या गावातील नागरिकांशी खूप मिसळला होता. बिहारच्या या उगवत्या स्टारने पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एमएस धोनीसह कई पो छे’, शुद्ध देसी रोमान्स, पीके, केदारनाथ आणि त्याचे इतर अनेक चित्रपट हिट झाले आहेत. संपादन - अक्षय शितोळे