JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / करिना-शाहरुखसारख्या कलाकारांनी सुशांतला दिली होती अपमानास्पद वागणूक, नेटिझन्सचा आरोप

करिना-शाहरुखसारख्या कलाकारांनी सुशांतला दिली होती अपमानास्पद वागणूक, नेटिझन्सचा आरोप

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. ज्यात शाहरुख-करिना सारख्या बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी सुशांतला वाईट वागणूक दिली होती असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जून : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता बॉलिवूडमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता सोशल मीडियावर बॉलिवूडच्या नेपोटिझमवर वारंवार बोललं जात आहे. त्याला बॉलिवूडकरांनी आपलेपणाची वागणूक दिली नाही. त्याच्याशी त्यांचं वागणं सुद्धा चांगलं नव्हतं असं बोललं जात असताना काही थ्रोबॅक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात शाहरुख-करिना सारख्या बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी सुशांतला वाईट वागणूक दिली होती असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला शाहरुख आणि सुशांतचा हा व्हिडीओ एका अवॉर्ड फंक्शनमधलला आहे. ज्यात त्यांच्यासोबत शाहिद कपूर सुद्धा दिसत आहे. सुशांतला स्टेजवर बोलवून त्याच्या सिनेमाची, डान्सची आणि गाण्याची खिल्ली उडवली गेल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे शाहरुख खानचा सुशांत खूप मोठा चाहता होता आणि अनेकदा त्यानं या गोष्टीचा उल्लेख मुलाखतींमध्ये केला होता. ‘अनिल कपूरची मुलगी नसतीस तर..’ सोनमच्या ‘त्या’ ट्वीटवर का भडकले नेटकरी

याशिवाय करिना कपूरचा सुद्धा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिनं सुशांतला अपमानास्पद वागणूक दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओमध्ये करिना एका मुलाखतीत विचारलं जात की तू सारा अली खानला रिलेशनशिपबाबत काय सल्ला देशील. त्यावर करिना म्हणाली तिला मी सांगेन की, तिच्या पहिल्या हिरोला तिनं कधीच डेट करू नये. सारानं केदारनाथमधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं आणि या सिनेमात सुशांत मुख्य भूमिकेत होता. त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्येनंतर हा व्हिडीओ सोशल मीडिवर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

याशिवाय सोनम कपूर आणि आलिया भट याचेही सुशांतबद्दल काही वक्तव्य केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

जाहिरात
जाहिरात

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडनधील नेपोटिझमचा वाद पुन्हा एकदा उफळून आला आहे. कंगना रणौतनं सुशांतच्या निधानंतर एका व्हिडीओ शेअर केला ज्यात तिनं बॉलिवूडमध्ये होतं असलेल्या भेदभावावर भाष्य केलं होतं. त्यानंतर बबिता फोगाट, अभिनव कश्यप, कोएना मित्रा रवीना टंडन यांसारख्या कलाकारांनी बॉलिवू्डमधल्या नेपोटिझमच्या काळ्या बाजूवर आपली मतं मांडली आहेत. डिसेंबरमध्ये होणार होतं सुशांतचं लग्न, चौकशीनंतर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या