JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तुझ्या पाठीशी तर..', सुशांतच्या बहिणीनं रियाच्या कमबॅकवर केला संताप व्यक्त

'तुझ्या पाठीशी तर..', सुशांतच्या बहिणीनं रियाच्या कमबॅकवर केला संताप व्यक्त

अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या कामापेक्षा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळं नेहमी चर्चेत असते. आता रिया चक्रवती पुन्हा तिच्या कमबॅकमुळं चर्चेत आली आहे. रिया चक्रवर्तीचा व्हिडिओ पाहून सुशांत सिंह राजपूतच्या बहीण प्रियांका सिंहनं संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात

सुशांतच्या बहिणीनं रियाच्या कमबॅकवर केला संताप व्यक्त

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 एप्रिल- अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या कामापेक्षा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळं नेहमी चर्चेत असते. आता रिया चक्रवती पुन्हा तिच्या कमबॅकमुळं चर्चेत आली आहे. एमटीव्ही रोडीजच्या 19 व्या सीजनमधून ती कमबॅक करणार आहे. तिनं नुकताच या शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि यामुळं पुन्हा रियाचं नाव चांगलचं चर्चेत आलं आहे. रिया चक्रवर्तीचा हा व्हिडिओ पाहून सुशांत सिंह राजपूतच्या बहीण प्रियांका सिंहनं संताप व्यक्त केला आहे. सुशांत सिंहनं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी रिया चक्रवर्ती सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुशांतला जाऊन तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. आता अभिनेत्री रोडीजमधून कमबॅक करत आहे. तिनं इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. वाचा- आधीच विलन कमी होते का? आयेशाच्या रि-एंट्रीवर प्रेक्षकांनी केलं ट्रोल प्रियांकाची पोस्ट काय आहे? प्रियांकाची सिंहनं ट्वीटरवर रिया चक्रवर्तीचा अपमान करत खूप काही लिहिलं आहे. प्रियांकानं ही पोस्ट केली आहे, आणि लिहिलं आहे, तु काय घाबरणार..? तु तर.. कोणीतरी सत्ताधारीच तुला ही हिम्मत देऊ शकतो. सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात निर्णय देण्यास वेळ का होत आहे यासाठी कोण जबाबदार आहे हे यावरनं स्पष्ट होत आहे..अशी पोस्ट तिनं केली आहे. सध्या प्रियांकाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

संबंधित बातम्या

रिया चक्रवर्ती पोस्ट काय आहे? तिच्या कमबॅकबद्दल बोलताना रिया म्हणाली की, मला एमटीव्ही रोडीजच्या कर्म या कांड या सीजनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळतेय, यासाठी मी खूप उत्सुक आहे. एमटीव्हीसोबत काम करणं माझ्यासाठी माझ्या घरात काम कऱण्यासारखं आहे. एका नात्यानं माझी घर वापसी झाल्याचं तिनं म्हटलं आहे. सोबत तिनं पोस्ट करत म्हटलं आहे की, अजूनही माझा द्वेष, तिरस्कार करणाऱ्यांना मला सांगायचे आहे की, मी पुन्हा येते आहे.तुम्हाला काय वाटले मी पुन्हा येणार नाही का, पण तसे होणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मला कुणाला घाबरावे असे वाटत नाही. अशा शब्दांत रियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या तिच्या या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.

प्रियांकानं यापूर्वी देखील रिया चक्रवर्तीवर तोंडसुख घेतलं आहे. 14 जून 2020 मध्ये सुशांत सिंहनं राहत्या घरात आत्महत्या केली होती. रिया चक्रवर्तीवर सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला गेला होता. तसंच, आपल्या भावासोबत मिळून सुशांतला ड्रग्सचा नाद लावणं आणि त्याचा पुरवठा करण्याचा आरोपही तिच्यावर लावला गेला गेला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या