मुंबई, 10 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (rhea chakarborty) सुशांतचं कुटुंब आणि चाहत्यांनी कायमच लक्ष्य केलं. या प्रकरणाच्या ड्रग्ज अँगलच्या तपासानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) मंगळवारी अटक केली. न्यायालयानेही तिचा जामीन अर्ज फेटाळात तिला न्यायालयीन कोठडी ठोठावली. मात्र काही सेलिब्रिटींनी तिला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टिका होऊ लागली आहे. याच टिकेला आता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बॉलिवूड रियाला पाठिंबा का देत आहे, याचं उत्तर अनुराग कश्यम यांनी दिलं आहे. त्यांनी ट्विट केलं आहे.
“प्रत्येक जण रियावर आरोप करतो आहे. प्रश्न विचारतो आहे, रियाने त्याच्यासह काय केलं काय नाही हे तुम्हाला कसं माहिती. तो कोणत्या परिस्थितीतून जात होता तुम्हाला माहिती आहे का? संपूर्ण इंडस्ट्री सुशांतला गेल्या 9 ते 10 वर्षांपेक्षा जास्त ओळखते. त्याला पाहिलं आहे, त्याच्याशी संवाद साधला आहे.हो आम्ही चांगलंच ओळखत होतो. याच कारणामळे त्याच्या आदर असल्याने संपूर्ण इंडस्ट्री शांत राहिली होती आणि त्याच कारणामुळे आज आम्ही सर्वजण एकत्र रियासाठी उभे आहोत कारण खूप गोष्टी पुढे निघून गेल्या आहेत”, असं अनुराग कश्यप म्हणाले. हे वाचा - 11 वर्षांच्या स्वप्नांचा चुराडा; ऑफिस पाहताच पाहा कशी झाली कंगनाची अवस्था रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शोविकने सांगितलं होतं. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असं सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली. इतकंच नाही तर रियाने एनसीबीला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलिवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली.