JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीवर मोठा आरोप; NCB कडून तपास

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीवर मोठा आरोप; NCB कडून तपास

ड्रग्ज अँगलच्या तपासात आता अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीवरही (sushant singh rajput’s sister) आरोप होऊ लागले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (sushant singh rajput) प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह (rhea chakraborty) काही जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय आणखी काही जणांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान सुशांतच्या बहिणीचं (sushant sister) नावही आता या प्रकरणात घेतलं जातं आहे. सुशांतची बहीणदेखील ड्रग्ज पार्टीत असायची असा आरोप केला जातो आहे. एनसीबीकडून सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी सुरू आहे. दरम्यान श्रुतीचे वकील अशोक सरावगी यांनी सुशांतच्या बहिणीवर आरोप केला आहे की, सुशांतची बहीण ड्रग्ज घ्यायची, ड्रग्ज पार्टीत ती असायची. सुशांतची कोणती बहीण ड्रग्ज घ्यायची याबाबत त्यांनी सांगितलं नाही, तिचं नाव स्पष्ट केलेलं नाही. एनसीबीकडून तिचीही चौकशी होते आहे, असं त्यांनी सांगितलं. याआधी रियानेदेखील सुशांतच्या बहिणींवर आरोप केले होते. 8 जूनला सुशांतचं घर सोडून गेल्यानंतर त्याची बहीण मीतू त्याच्यासह राहायला आली होती. शिवाय रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंहविरोधातही मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिनं सुशांतला औषधांचं बोगस प्रीस्क्रिप्शन दिल्याचा रियाने आरोप केला. आता या प्रकरणातील ड्रग्ज अँगलच्या तपासातही सुशांतच्या बहिणीचं नाव घेतलं जातं आहे. हे वाचा -  ‘रिया को फसाओ असा ड्रामा सुरू’, अभिनेत्रीसाठी बॉलिवूडकरांचे माध्यमांना खुले पत्र रियाने एनसीबीला दिलेल्या कबुली जबाबात सुशांतच्या ड्रग्ज पार्ट्यांबद्दल मोठा खुलासा केला होता. बॉलिवूडमधील अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे. बॉलिवूडमधील 25 जणांची नावं तिनं आपल्या जबाबात दिली.  यामध्ये सारा अली खान, सिमॉन खंबाटा आणि रकुलप्रीत सिंह यांचंही नाव समोर आलं. मात्र त्यांना समन्स देण्यात आलेला नाही, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या