JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते', रवीना टंडनने केला चकीत करणारा खुलासा

'शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते', रवीना टंडनने केला चकीत करणारा खुलासा

रवीनाच्या या वक्तव्यावर ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’ मंचावरील वातावरण काहीसं गंभीर झालेलं दिसलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 एप्रिल : सोनी टीव्ही वरील डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. त्यमुळेच हा शो सध्या टीआरपी लिस्टमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी, कोरिओग्राफर गीता कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बासू परिक्षक म्हणून काम पाहत आहेत. प्रत्येक आठवड्याला या शोमध्ये कोणते ना कोणते सेलेब्रिटी हजेरी लावत असतात. या आठवड्यात ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’च्या मंचावर अभिनेत्री रवीना टंडन उपस्थित होती आणि तिनं यावेळी शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते असा आश्चर्यचकीत करणारा खुलासा या शोमध्ये केला.

वाचा : कर्करोगामुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था ‘सुपर डान्सर चॅप्टर 3’मध्ये पाहुणी म्हणून आलेल्या रवीनाला शिल्पानं विचारलं, ‘तुला आठवतं का आपली पहिली भेट कधी झाली होती.’ त्यावर रवीनानं मला आठवत नाही असं उत्तर दिलं. यानंतर शिल्पा म्हणाली, ‘मी बाजीगरची शूटिंग करत होते त्यावेळी तू शाहरुखला भेटायला आली होतीस. मी मागे वळून पाहिलं आणि मनात म्हटलं रवीना टंडन खूप सुंदर आहे यार.’ यावर उत्तर देताना रवीनानं सांगितलं की, शिल्पा शेट्टी माझ्यावर जळते. हे ऐकल्यावर मात्र शिल्पा सोबत बाकी सर्वजणही चकीत झालेले दिसले. पण रवीना असं का म्हणाली हे समजून घेण्यासाठी हा एपिसोड पाहावा लागणार आहे. या एपिसोडमध्ये रवीना आणि शिल्पा ‘ये जवानियाँ’ या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहेत.

वाचा : SOTY 2: Hook Up साँगच्या टीझरमध्ये दिसली टायगर-आलियाची केमिस्ट्री, Talia ला एकदा पाहाच सुपर डान्सरच्या मंचावर येणारा प्रत्येक सेलेब्रिटी वेगवेगळे खुलासे करत असतात. पण यावेळी रवीनाच्या खुलाशानंतर मात्र या मंचावरील वातावरण काहीसं गंभीर झालेलं दिसलं. मागच्या आठवड्यात या मंचावर अभिनेता सुनिल शेट्टीनं हजेरी लावली होती आणि शिल्पानं धडकन सिनेमाच्या क्लायमॅक्सबाबत खुलासा केला होता. तसेच हा सिनेमा पूर्ण व्हायला 5 वर्ष लागली होती असंही याठिकाणी शिल्पानं स्पष्ट केलं होतं. वाचा : यूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या