JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Teachers Day 2022: 'सुपर 30 ते '3 इडियट्स' पर्यंत, शिक्षक दिनी हे 5 चित्रपट नक्की पाहा

Teachers Day 2022: 'सुपर 30 ते '3 इडियट्स' पर्यंत, शिक्षक दिनी हे 5 चित्रपट नक्की पाहा

देशभरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 सप्टेंबर: देशभरात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकाच्या जीवनात गुरुचं महत्त्व खूप अनमोल असतं. गुरूशिवाय विद्यार्थ्याचे जीवन अपूर्ण मानलं जातं. त्यामुळे आजच्या दिवशी सगळे आपल्या गुरुचे आभार मानत असतात. अशातच बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुंदर नाते दाखवण्यात आले आहे. चला मग जाणून घेऊया असे कोणते 5 चित्रपट आहेत. 3 idiots - आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी स्टारर ‘3 इडियट्स’ प्रचंड गाजला. भारतीय शिक्षण व्यवस्था दाखवणारा विनोदी शैलीमधील चित्रपट आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला प्रोफेसर वीरू सहस्रबुद्धे यांच्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले संबंध नसतात. मात्र हळूहळू त्यांच्यातील संबंध बदलत जातात. super 30 - हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर स्टारर ‘सुपर 30’ या चित्रपटात हृतिकने गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका साकारली आहे. जो मागासवर्गीय 30 IIT इच्छुकांना शिकवतो. चित्रपटात हृतिकने आनंदच्या भूमिकेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अनोखे बंध दाखवले आहेत. हेही वाचा -  Mega Blockbuster Trailer: ना चित्रपट, ना सिरिज, कपिल शर्मा-दीपिका पदुकोणच्या मेगा ब्लॉकबस्टरचं सत्य आलं समोर Hichki - हिचकी या चित्रपटात राणी मुखर्जीने शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. ती एका शाळेत मागासलेल्या आणि गरीब विद्यार्थ्यांना शिकवते. शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांचे जीवन चांगलेच बदलू शकते हे या चित्रपटात दाखवून दिलं आहे. Tare Jamin Par - आमिर खान स्टारर या चित्रपटात दर्शील सफारीचीही महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये दर्शील डिस्लेक्सियाशी झुंड देत असताना पहायला मिळाला. आमिरने रामशंकर निकुंभ नावाच्या एका विशेष शिक्षकाची भूमिका साकारली आहे, तर दर्शीने इशान अवस्थीची भूमिका साकारली आहे. रामशंकर इशानला अभ्यासात मदत करतो, त्याला समजून घेतो. Nil Battey Sannata - स्वरा भास्कर स्टारर या चित्रपटात शिक्षक-विद्यार्थी तसेच आई-मुलीचे नाते दाखवण्यात आले आहे. स्वरा या चित्रपटात आईच्या भूमिकेत असून तिच्या मुलीला गुरूप्रमाणे मार्गदर्शन करते आणि तिची मुलगी आयएएस बनते. दरम्यान, आज सगळीकडे शिक्षक दिन आनंदानं साजरा होताना दिसत आहे. सगळे आपल्या गुरुंचे आभार मानत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या