सनी देओलचा मुलगा आणि होणाऱ्या सूनेची लंच डेट
मुंबई, 11 मे- बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई सुरु झाली आहे. परिणीती चोप्रासोबत आता करण देओलच्या लग्नाचीही जोरदार चर्चा होत आहे. बॉलिवूडचं प्रसिद्ध देओल कुटुंब सध्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहे. घरात लवकरच नवी सून येणार आहे. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा नातू अर्थातच सनी देओल चा मुलगा करण देओल विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र अद्याप सनी देओलच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. दुसरीकडे, लग्नाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच करण आणि होणारी पत्नी दृशा आचार्य एकत्र स्पॉट झाले आहेत. बुधवारी हे जोडपं लंच डेटला गेलेलं दिसून आलं. करण आणि दृशाला पहिल्यांदाच एकत्र पाहिल्यानंतर सर्वजण उत्सुक झाले आहेत. तसेच लग्नाच्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचंही म्हणत आहेत. या जोडप्याने लंच डेटसाठी कॅज्युअल पोशाख परिधान केला होता. करणने ब्लॅक ग्राफिक टी-शर्ट आणि सिंपल शॉर्ट्स घातले होते. तर दृशा रीप्ड ब्लू जीन्स आणि ब्लॅक टी-शर्टमध्ये एकदम कूल दिसत होती. यासोबत दोघांनी मॅचिंग सनग्लासेससुद्धा कॅरी केले होते. या दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे. दोघेही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. (हे वाचा: सनी देओलचा होता वडील धर्मेंद्रच्या दुसऱ्या लग्नाला विरोध, करणार होता सावत्र आई हेमाला मारहाण? आईने सांगितलं सत्य ) मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण देओल आणि दृशा आचार्य गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दृशाचा थेट चित्रपट जगताशी संबंध नसून ती प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची पणतू आहे. ती ट्रॅव्हल इंडस्ट्रीत काम करते. मिळालेल्या माहितीनुसार, करण आणि दृशाच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम मुंबईतच होणार आहेत. 16 ते 18 जून दरम्यान विवाहसोहळा पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये लग्नाच्या सर्व पारंपरिक विधींचा समावेश असणार आहे. देओल कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सनी देओल लवकरच घरामध्ये मोठ्या सुनेचं स्वागत करणार आहे.
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या नातवाच्या लग्नासाठी बॉलिवूडमधील सर्व खास लोकांना आमंत्रित करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. कारण देओल कुटुंबात अनेक वर्षानंतर लग्नकार्य पार पडत आहे. तर दुसरीकडे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, हेमा मालिनी आणि प्रकाश कौर यांच्या दोन्ही कुटुंबात असणारे मतभेद या लग्नामुळे काहीशे कमी होतील. आणि हेमा मालिनीसुद्धा आपल्या सावत्र मुलाच्या लग्नात सहभागी होतील.
करण देओलबाबत सांगायचं झालं तर, त्याने आजोबा आणि वडिलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘पल पल दिल के पास’ हा त्याचा डेब्यू चित्रपट होता. दरम्यान येत्या काळात तो ‘अपने 2’ या चित्रपटात आजोबा धर्मेंद्र आणि काका बॉबी देओलसोबत दिसणार आहे.