13 आॅगस्ट : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातलं भांडण चांगलंच गाजलंय. कपिलला अलविदा केल्यानंतर सुनील काय करणार यावर बरेच तर्कवितर्क लढवले जात होते. अशी चर्चा होती की तो सोनीवर नवी शो सुरू करतोय. असंही म्हटलं जायचं तो कृष्णा आनंदचा ‘द ड्रामा कंपनी’ जाॅइन करतोय. आता अशी चर्चा आहे की कपिलनं सुनीलला मनवलंय. आणि कपिल शर्मा शोमध्ये सुनीलचा तोच तडका पाहायला मिळणार आहे. पण कपिलनं आपले पत्ते उघडले नाहीयत. पण आता सुनील ग्रोव्हरचे काही शूटिंगचे फोटोज बाहेर आलेत. त्यात ग्रामीण भाग दिसतोय. याशिवाय सुनीलचा एक व्हिडिओ वायरल झालाय. त्यात तो दारू प्यायल्याचा अभिनय करतोय. पोलीस त्याची चौकशी करतोय. हा पाहा वायरल झालेला सुनीलचा व्हिडिओ. सुनीलनंच तो फेसबुकवर पोस्ट केलाय.