JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनयसृष्टीवर Heart Trouble ची टांगती तलवार! अमिताभ दयालच्या मृत्यूदिवशीच आली आणखी एका हार्ट सर्जरीची बातमी

अभिनयसृष्टीवर Heart Trouble ची टांगती तलवार! अमिताभ दयालच्या मृत्यूदिवशीच आली आणखी एका हार्ट सर्जरीची बातमी

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचे आज, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना ताजी असतानाच आता बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याला हृदयाची सर्जरी करावी लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 फेब्रुवारी- Sunil Grover Heart Surgery:  टीव्ही क्षेत्रातला उत्तम अभिनेता, विनोदी कलाकारांपैंकी एक म्हणजे सुनील (Sunil Grover) ग्रोव्हर. सर्वांना दिलखुलास हसवणाऱ्या  सुनील ग्रोव्हरला मात्र काही दिवसापूर्वी  ह्रदयाचा त्रास जाणवू लागला. मिळालेल्या माहितीनुसार ह्रदयामध्ये ब्लॉकेज (Heart Blockage) असल्याचे सुनीलला समजले त्यानंतर त्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्जरी करण्यापूर्वी सुनील त्याच्या आगामी वेब सिरीजचे चित्रकरण करत होता. News18 इंग्रजीसोबत बोलताना सूत्रांनी सांगितले की, अशा स्थितीमध्ये देखील सुनिलने पुण्यात त्याच्या आगामी वेब सिरीजचे चित्रकरण केले. त्याने त्याचे काम पूर्ण केले व नंतरच सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ह्रदयामध्ये ब्लॉकेज होते मात्र तरी देखील त्याने चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. सुनिलच्या सर्जरची माहिती सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टावर दिल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करायला सुरूवात केली. तसेच कमेंट करत अनेकांनी त्याला काय होणार नाही , असे देखील म्हटलं आहे. वाचा- सलमानमुळे लग्नानंतरचा पहिला V-Day कॅट -विकीसोबत करणार नाही साजरा सुनील ग्रोव्हर शेवटचा Zee5 च्या ‘सनफ्लावर’ या वेब सिरीजमध्ये आशीष विद्यार्थी, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी आणि मुकुल चड्ढा यांच्यासोबत दिसला होता. यासोबतच मागील वर्षी तो सैफ अली खानच्या ‘तांडव’ या सिरीजमध्ये देखील दिसला होता. यामध्ये सुनिलने महत्त्वाची भूमिका होती.

संबंधित बातम्या

सुनील ग्रोव्हरला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शो मधून प्रसिद्धी मिळाली. त्याने आजवर भरपूर भूमिका साकारल्या पण त्याची गाजलेली भूमिका म्हणजे ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ मधील ‘गुत्थी आणि रिंकु भाभीची’. आपल्या कॉमेडी टाइमिंगमुळे त्याने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. वाचा- मोठी बातमी! हृदयविकाराच्या झटक्याने बॉलिवूड अभिनेत्याचे निधन बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल (Amitabh Dayal) यांचे आज,  बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 51 वर्षीय अमिताभ दयाल यांनी आज पहाटे 4.30 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर आता सुनील ग्रोव्हरच्या हार्ट सर्जरीची बातमी समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या