सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हा विनोदी कलाकार, गायक, अभिनेता आणि टीव्ही होस्ट देखील आहे. सुनीलला सायलेंट कॉमेडी शो ‘गुटर गु’ मधून ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने आपल्या कॉमेडी टायमिंगने सर्वांची मने जिंकली.
काँमेडीयन सुनील ग्रोव्हरने (sunil grover) आपल्या कॉमेडीच्या (comedy) जोरावर अवघ्या देशात प्रसिध्दी मिळवली. तसेच कपिल शर्माच्या (kapil sharma )कॉमेडी शोमधून लोकांच्या मनामनात घरं केलं आहे.
टीव्हीसोबतच त्याने चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'भारत' आणि 'बागी'मध्ये त्याला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकेकाळी फक्त 500 रुपये कमावणारा सुनील ग्रोव्हर आज कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
सुनील ग्रोव्हरने कॉमेडी शो करण्याबरोबरच अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्येही काम केले आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये साकारत असलेल्या अनेक पात्रांनी त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मग ते गुत्थीचे पात्र असो किंवा डॉक्टर मशूर गुलाटी. तो सर्वांना खूप आवडतो. सुनीलच्या वेगवेगळ्या पात्रांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सुनील ग्रोवरचा जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणातील सिरसा येथे झाला. सुनील हा हरियाणवी-पंजाबी कुटुंबातील आहे. वडील बँक मॅनेजर होते, त्याला एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे.
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत स्ट्रगल जर्नीवर भाष्य केले आहे. पहिल्यापासूनच अभिनयाची आणि लोकांना हसवायला आवडते. बारावीत असताना नाटक स्पर्धेत भाग घेतला होता. मी यात भाग घेऊ नये, कारण इतरांवा अन्याय होईल, असे प्रमुख पाहुण्यांनी सांगितले. मी थिएटरमध्ये माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, अभिनयासाठी मुंबईला गेलो.
तसेच, 500 रुपये ही माझी पहिली कमाई होती, पण मी पैसे कमावण्याची चिंता केली नाही, कारण मला माहित होते की मी खूप पैसे कमावणार आणि यशस्वी होणार, पण या शर्यतीत मी हरलो तर मला समजले. असेही त्याने यावेळी सांगितले.
अभिनेता सुनील एका वर्षात सुमारे 2.5 मिलियन युस डॉलर्स कमावतो म्हणजे भारतीय रुपयात सुमारे 18 करोड रुपये आहे. टीव्ही मध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडचे सुमारे 10 ते 15 लाख रुपये मानधन घेतो. तर एका ब्रँडचे काम करण्यासाठी 50-60 लाख रुपये इतके मानधन आकारतो. कमाईच्या बाबतीत अग्रेसर असलेला अभिनेता सुनील ग्रोव्हर समाजकार्य करायला मागे हटत नाही.
सुनील ग्रोव्हरने 2013 मध्ये मुंबईच्या उपनगर भागात एक घर खरेदी केले. त्याने ते घर अडीच कोटींना विकत घेतले. एवढेच नव्हे, तर देशातील अनेक शहरांमध्ये सुनीलची मालमत्ता आहे.
सिनेमा आणि टीव्हीच्या दुनियेपासून दूर राहून अभिनेता सुनील ग्रोव्हरची पत्नी आरती ग्रोव्हर एक साधे जीवन जगणे खूप आवडते. पण तिचे सौंदर्य बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
सौंदर्याबद्दल ती सतत चर्चेत असलेल्या आरती ग्रोव्हर हीने आपले शिक्षण इंटिरियर डिझायनर मध्ये पूर्ण केले आहे.