मुंबई, 15 जानेवारी- छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ **(sundara manamadhe bharali )**ही मालिका लोकप्रिय मालिकापैकी एक आहे. या मालिकेत लतिकाचे (latika) मुख्य भूमिकेत अक्षया नाईक तर अभिमन्यूच्या भूमिकेत समीर परांजपे दिसत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी आहे. प्रेक्षकांना या जोडीची केमिस्ट्री खूप आवडते. सौंदर्य म्हणजे केवळ बारीक दिसणं आणि ग्लॅमरस असणं नव्हे, तर सौंदर्य हे मनात असतं हेच या मालिकेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही मालिका सौंदर्याची परिभाषा खऱ्या अर्थाने उलगडत असल्याचं दिसून येत आहे. आता या मालिकेत लतिका म्हणजे अक्षया नाईकने (Akshaya Naik Latest Photos) एक फोटोशुट केलं आहे,ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिच्या सौंदर्याचा वजनदार मामला पाहून तुम्ही देखील म्हणाल …सुंदरा मनामध्ये भरली…! अक्षया नाईकने तिच्या इन्स्टार तिचे काही साडीतील फोटो व व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या फोटोंवर व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. अक्षया नाईकने यामध्ये ऑफ व्हाईट रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचे ब्लाऊज घातले आहे. गळ्यात एक मंगळसूत्र आणि कानात मस्त झुमके घातले आहेत. शिवाय तिची नोजरिंग तिच्या सौंदर्यात भरच टाकते. केसात माळलेला गजरा हा तिचा साऊथ इंडियन लुक चाहत्यांना मात्र घायाळ करत आहे. तिनं पोंगल या सणासाठी हा खास लुक केला आहे. फोटो पोस्ट करत तिनं सर्वांना पोंगलाच्या शुभेच्छा देखील दिला आहे.
अक्षया यापुर्वी हिंदी मालिकांमध्ये दिसली होती. अक्षया मालिकेत साध्या लूक्समध्ये दिसत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच मॉडर्न आहे.अक्षया सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. सध्या तिच्या या नव्या फोटोशुटमुळी ती चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा- नव्या मालिकेला कोरोनाचा धस्का! ‘पिंकीचा विजय असो’च्या वेळापत्रकात बदल दक्षिण भारतात पोंगल (Pongal) या सणाला विशेष महत्त्व आहे. पोंगल हा सण चार दिवस साजरा केला जातो. कापणीचा सण पोंगल 14 किंवा 15 जानेवारी रोजी येतो. दक्षिण भारतातील लोक नवीन वर्ष म्हणून पोंगल सणही साजरा करतात.