JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत येणार मोठा TWIST; अडाणी गौरी होणार वकील अन्...

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत येणार मोठा TWIST; अडाणी गौरी होणार वकील अन्...

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या मालिकेत गौरी आणि जयदीपचा हनिमून ट्रॅक सुरू आहे. लवकरच मालिकेत मोठा TWIST पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जानेवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं  (Sukh Mhanje Nakki Kay Asta)  ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची (  jaydeep and gauri) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सध्या मालिकेत गौरी आणि जयदीपचा हनिमून ट्रॅक सुरू आहे. या दोघांच्यातील रोमॅंटिक सीन पाहायला प्रेक्षकांना देखील खूप आवडत आहेत. मात्र मालिकेत लवकरच एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. या ट्वीस्टमुळे गौरीचे तर आयुष्य बदलणारच आहे. शिवाय शिर्के पाटील कुटुंबाला त्रास देणाऱ्या शालिनाला देखील चांगलाच बोध मिळणार आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत लवरच मोठा ट्वीस्ट येणार आहे. अडाणी गौरी लवकरच वकील होणार आहे. जयदीप गौरीला वकील करणार आहे. वकील झाल्यानंतर गौरी पहिल्यांदा शालिनीला धडा शिकवणार आहे. त्यामुळे मालिकेतील हा नवीन ट्वीस्ट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. वाचा- गुगलसह सुंदर पिचाई अडचणीत; फिल्ममेकरने दाखल केला FIR कारण… गौरीची भूमिका सुरूवातीपासुनच साधी दाखवण्यात आली आहे. ती शिर्के पाटील कुटुंबात सुरूवातीपासुन पडेल ते काम करते तेही प्रामाणिकपणे. याच प्रामाणिकपणाने तिनं आप्पा आणि मायीचा विश्वास प्राप्त केला आहे. आता ती जयदीपची बायको आणि शिर्के पाटील कुटुंबाची सून आहे. मात्र आजही गौरी तशीच साधी आहे. गौरीच्या याच साधेपणावर जयदीप प्रेम करतो. आता त्याने गौरीला शिकवण्याच निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा नवीन ट्वीस्ट गौरीचं आयुष्य तर बदलणारच आहे. शिवाय शिर्के पाटील कुटुंबाला शालिनीच्या जाजातून कायमचे मुक्त देखील करू शकते. त्यामुळे मालिकेला हा ट्वीस्ट वळण देणारे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

याशिवाय काही दिवसापूर्वी एक प्रोमो समोर आला होता. यात आई अंबाबाईने गौरीला मुलं न होण्याचा कौल दिला होता. यामध्ये शालिनिचा तर हात नाही ना असा देखील प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या भागातच या सर्व प्रश्नाचे उत्तरे मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या