मुंबई, 3 जानेवारी- स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर 31 जानेवारीपासून एक नवीन मालिका सुरू होणार आहे. ही नवीन मालिका स्टार प्लसवरील एका लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असणार आहे. या हिंदी मालिकेचे नाव गुम है किसी के प्यार मे असं नाव आहे. याच्या मराठी रिमेकचे नाव लग्नाची बेडी (Lagnachi Bedi ) असं आहे. मराठीतील मोठी स्टारकास्ट या मालिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने या मालिकेचा नुकताच प्रोमो आऊट केला आहे. हा प्रोमो शेअर करत म्हटले आहे की, शतजन्माचे अतूट नाते जीव दोघांचे जोडी,स्वर्गातच बांधली जाते ही ‘लग्नाची बेडी’…नवी मालिका, ‘लग्नाची बेडी’ प्रवाह दुपार सोमवार 31 जानेवारीपासून,सोम-शनि दु. 1:०० वा. Star प्रवाहवर… #Lagnachi Bedi #Star Pravah. वाचा- हृतिकसाठी अभिनेत्रीचा Shockingनिर्णय, म्हणते…‘नवऱ्याला टेकडीवरुन ढकलून देऊ का? हिंदी मालिकेत विराज सई आणि पाकी असा प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो. या मालिकेत देखील असंच काही दिसणार असल्याचे प्रोमो पाहिल्यानंतर लक्षात येते. यामध्ये विराजच्या भूमिकेत मराठी अभिनेता संकेत पाठक तर सईच्या भूमिकेत सायली देवधर दिसणार आहे. यासोबतच बाकीचे नकारात्मक भूमिका स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले साकारणार आहे. सई आणि विराजची जोडी ज्याप्रमाणे लोकप्रिय आहे त्याप्रमाणे मराठीतील ही नवीन जोडी देखील लोकप्रियता मिळवण्यात यशस्वी होणार का याची उत्सुकता लागली आहे.
आता अनेक मराठी मालिकांचे हिंदीसह विविध भाष्यांमध्ये रिमेक होत आहेत. त्याचप्रमाणे हिंदी मालिकांचे देखील मराठीत रिमेक होत आहे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेचा हिंदी रिमेक स्टार प्रवाहवर पाहायला मिळतो. याचे नाव अनुपमा आहे. मालिका जरी रिमेक असल्या तरी यामधील कलाकार त्यांच्या अभिनय कौशल्याच्या जीवावर या भूमिकांमध्ये जीव ओतत असतात. म्हणूनच आज रिमेकची चलती आहे. प्रेक्षकांकडून देखील याला चांगली पसंती मिळत आहे. नवीन वर्षात अशा अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत व काही आल्या देखील आहेत. पिंकीचा विजय असो, अबोली या मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिका देखील दुसऱ्या भाषेतील मालिकांचा रिमेक आहेत. वाचा- आलियाला इम्प्रेस करण्यासाठी महेश भट्ट यांनी घेतला होता SRK चा आधार स्टार प्रवाह प्रमाणे झी मराठी, सोनी मराठी तसेच कर्लस मराठी या वाहिनीवर देखील नवीन मालिका नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही आल्या देखील आहेत. मराठी मालिकांना मोठा प्रेक्षक वर्ग आहे. याचाच फायदा या वाहिन्यांना होत आहे. आता काही मालिकेंचे विविध भाषेत रिमेक देखील केले जात आहेत.