स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) मुरांबा ( Muramba) या मालिकेत सध्या रमा आणि अक्षय ( Rama Akshay) यांच्या नात्याचा मुरांबा हळूहळू मुरायला सुरुवात झाल आहे. सगळीकडे पावसाळी वातावरण पाहायला मिळतय. रमा आणि अक्षय यांच्या गोड प्रेमाच सुरुवातही वरुणराजाच्या सरींनी होणार आहे. मालिकेच्या महाएपिसोडमध्ये रमा अक्षय यांचा रोमँटिक अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या येत्या भागात रमा आणि अक्षय पावसात मनसोक्त भिजत एकमेकांच्या प्रेमात आकांत बुडलेले पाहायला मिळणार आहेत.
रविवारच्या महाएपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की, मुकादम कुटुंब पिकनिकसाठी निघालं आहे. पावसात पिकनिकचा आनंद काही औरच. पावसात भिजण्याचा मोह रमाला काही आवरत नाही.
अक्षयला पावसात भिजायला आवडत नाही. मात्र रमावरच्या प्रेमापोटी अक्षयही पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटणार आहे.
येत्या रविवारी म्हणजेच १० जुलैला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता हा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करत मुरांबा मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास भागाचं शूटिंग पूर्ण केलं.