मुंबई, 02 सप्टेंबर : अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) गेल्या 24 तासात मुंबईमध्ये वेगवान घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान यामध्ये समोर आलेल्या ड्रग डीलिंगची पाळंमुळं गोव्यापर्यंत पोहोचली आहेत. अंंमली पदार्थ तस्करी (Drug Dealing) प्रकरणी NCB चे मुंबईमध्ये अटकसत्र सुरू झाले आहे. मुंबईत झालेल्या 2 अटकेनंतर आता गोव्यामधून देखील एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी NCB ची ही तिसरी अटक आहे. फैयाज अहमद नावाच्या तरुणाला गोव्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याचे गौरव आर्य (Gaurav Arya) शी संबंध असल्याचे बोलले जात आहे. तो गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये ड्रायव्हर म्हणून काम पाहायचा. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे फैयाजकडून बंगळुरूमधील एका श्रीमंत व्यक्तीला ड्रग सप्लाय करण्यात येणार होता आणि हा इसम पेज 3 पार्ट्यांमधील महत्त्वाचा इसम आहे. (हे वाचा- कंगनाने करण जोहरबाबत व्यक्त केली भीती, पंतप्रधानांकडे मागितली मदत) दरम्यान मुंबईत अटक झालेल्या दोघांशीही तर शौविकचे (Showik Chakraborty) कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अडचणी आणखी वाढल्या आहेत. जैद आणि बशीद अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी एनसीबीकडून जैद नावाच्या ड्रग डीलरला अटक करण्यात आली. जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शौविकच्या संपर्कात होता. तो वांद्रे याठिकाणचा होता. जैदने अनेकदा शौविकला अंमली पदार्थांची डिलीव्हरी केल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे NCB ला शंका आहे की रिया देखील शौविककडून अंमली पदार्थ घेत असावी. या घटनांनंतर रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला NCB लवकरच ताब्यात घेणार आहे अस बोलले जात आहे. जैदकडून 17 मार्च 2020 या दिवशी शौविकने अंमली पदार्थ घेतले होते, असे समोर आले आहे. (हे वाचा- LIVE: रियाच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये राष्ट्रीय बिलियर्ड्स खेळाडूचे नाव आले समोर) तर याच अंमली पदार्थ प्रकरणी NCBने आज पहाटे बशीद परिहार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे. हा तोच बशीद आहे ज्याने जैदची ओळख शोविकशी करुन दिली होती. बशीद आणि शौविकचे खास संबंध असून शौविक, बशीद आणि जैद अशी तिघांची जोडी होती. जैद हा बांद्राला राहत असून त्याचे पुर्ण नाव जैद विलात्रा आहे. NCB च्या हाती एक WhatsApp चॅट लागलंय ज्यात या जैद आणि बशीदचे नाव आहे. जैद सॅम्युअल मिरांडाच्या देखील संपर्कात होता. जैदचे बशीद आणि सुर्यदिप मल्होत्रा नावाच्या दोन तरुणांसोबत WhatsApp चॅट समोर आले आहे. सुर्यदिप देखील शौविकशी संपर्कात असलेल्यांपैकी एक आहे. 17 मार्च 2020 ला शौविकने सॅम्युअल मिरांडाला जैदचा नंबर दिला होता आणि सॅम्युअलला 5g बदल्यात 10 लाख रुपये देण्यास सांगितले होते.