JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बाहुबलीच्या वाढदिवसालाच राजमौलींच्या RRR चा लुक जाहीर! अजय देवगण, आलियाही चमकणार

बाहुबलीच्या वाढदिवसालाच राजमौलींच्या RRR चा लुक जाहीर! अजय देवगण, आलियाही चमकणार

एस एस राजामौली दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा आरआरआर (Roudram Ranam Rudhiram) मध्ये ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt), ओलिविया मॉरिस (Olivia Morris) आणि अन्य काही कलाकार अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

0111

बाहुबलीचे दिग्दर्सक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांची पुढची सर्वात मोठी फिल्म 'आरआरआर’ (Roudram Ranam Rudhiram) असणार आहे. बाहुबलीएवढीच चाहत्यांना या सिनेमाची देखील उत्सुकतचा आहे.

जाहिरात
0211

एनटीआर, एसएस राजामौली आणि राम चरण तेजा स्टारर आरआरआर (Roudram Ranam Rudhiram) चा एक खास व्हिडीओ 22 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एनटीआरच्या भूमिकेचा परिचय दिला आहे.

जाहिरात
0311

लॉकडाऊनमुळे हा व्हिडीओ सुरुवातीच्या काळात प्रदर्शित नव्हता झाला. यामध्ये जुनिअर एनटीआर (Junior NTR) 'भीम' ही भूमिका साकारत आहे. आरआरआरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे.

जाहिरात
0411

फिल्म आरआरआर (Roudram Ranam Rudhiram) मध्ये ज्युनिअर एनटीआरच्या लुकची चाहते गेले महिन्यांपासून वाट बघत आहेत. या सिनेमात ज्युनिअर एनटीआर (Jr. NTR), राम चरण (Ram Charan), अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt), ओलिविया मॉरिस (Olivia Morris) आणि अन्य काही कलाकार अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

जाहिरात
0511

हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तमिळ,मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

जाहिरात
0611

एसएस राजामौली दिग्दर्शित हा सिनेमा एक पीरिएड ड्रामा आहे. यामध्ये स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या तरुणपणीची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे.

जाहिरात
0711

एनटीआरने राम चरणच्या व्हिडीओला आवाज दिला आहे, जो सुरुवातीला जारी करण्यात आला होता.

जाहिरात
0811

याच कारणामुळे ज्युनिअर एनटीआर देखील या व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत होता. याबाबत दोघांचे ट्विटरवरील संभाषण फारच रंजक आहे.

जाहिरात
0911

सोशल मीडियावर बऱ्याच काळासाठी हा व्हीडिओ ट्रेंड करत होता. चाहत्यांच्या पसंतीस हा VIDEO उतरला आहे.

जाहिरात
1011

एसएस राजामौली दिग्दर्शित RRR डीवीवी दानय्या द्वारे डीवीवी एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे.

जाहिरात
1111

आज बाहुबली प्रभासच्या वाढदिवशी एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमाची चर्चा सर्वत्र होत आहे. त्याचप्रमाणे ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा यांना पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या