JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / साऊथ स्टार Sai Dharam Tej अखेर घरी परतला; अभिनेत्याचा 2 महिन्यापूर्वी झाला होता गंभीर अपघात

साऊथ स्टार Sai Dharam Tej अखेर घरी परतला; अभिनेत्याचा 2 महिन्यापूर्वी झाला होता गंभीर अपघात

अभिनेता मायदेशी परतल्यानंतर चिरंजीवी आणि त्याच्या कुटुंबीयांनी सेलिब्रेशन केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये राम चरणसह सर्व लोक दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,7  नोव्हेंबर- साऊथ  (South Actor)  सिनेसृष्टीतील स्टार चिरंजीवीचा पुतण्या साई धरम तेजचा  (Sai Dharam Tej) दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर तो कोमात गेला होता. अभिनेत्याला अपोलो जुबली हिल्समध्ये दाखल करण्यात आले होते. आता तो घरी परतला आहे. अशा परिस्थितीत अभिनेता मायदेशी परतल्यानंतर चिरंजीवी आणि त्याच्या कुटुंबीयांनी सेलिब्रेशन केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये राम चरणसह सर्व लोक दिसत आहेत.

संबंधित बातम्या

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये साई धरम तेजच्या घरवापसीचे जोरदार स्वागत होत असून कुटुंबाने जल्लोष केल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्यासोबत राम चरण, चिरंजीवी, अल्लू अर्जुन आणि पवन कल्याण दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. आपल्याला सांगू इच्छितो, की दोन महिन्यांपूर्वी त्याच्या बाईकला अपघात झाल्याची बातमी आली होती. घटनेनंतर लगेचच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतर त्यांना अपोलो ज्युबिली हिल्स येथे हलवण्यात आले. बातमीनुसार, साई धरम तेज आपल्या स्पोर्ट्स बाईकवरून जात होता. ज्युबिली हिल्स आणि आयकेईए या पुलावरील चिखलामुळे साईचा दुचाकीवरील ताबा सुटला होता आणि हा अपघात झाला होता. यावेळी त्याने हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्याच्या डोक्याला कोणतीही जखम झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच साईचे मामा आणि अभिनेता पवन कल्याण रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर इतर अनेक सेलिब्रिटीही त्याला भेटायला पोहोचले होते. साई धरम तेज हा साऊथ सिनेमाचा सुपरस्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा भाचा आहे. साई अल्लू अर्जुन, राम चरण, अल्लू शिरीष आणि वरुण तेज यांचा भाऊसुद्धा आहे. (हे वाचा: ' बिग बॉस’ फेम रुबिना दिलैकच्या बहिणीचा झाला साखरपुडा; सुंदर फॅमिली फोटो VIRAL ) साई धरमच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 2014 मध्ये ‘पिल्ला नुवु लेनी जीवनम’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. साई धरम तेजचा ‘रिपब्लिक’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. तो ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात ऐश्वर्या राजेश, जगपती बाबू आणि रम्या कृष्णन यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जे भगवान आणि पुलराव यांनी त्याची निर्मिती केली होती. हा चित्रपट एका राजकीय थ्रिलरवर आधारित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या