JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दोन वर्षांनी छोट्या पडद्यावर Bagyashree Limaye चे कमबॅक ; साकारणार खडूस बॉसची भूमिका

दोन वर्षांनी छोट्या पडद्यावर Bagyashree Limaye चे कमबॅक ; साकारणार खडूस बॉसची भूमिका

सोनी मराठी वाहिनीवर ‘बॉस माझी लाडाची’ (Boss Mazi Ladachi ) ही नवीन मालिका लवकरत सुरू होत आहे. भाग्यश्री लिमये (bhagyashree limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( aayush sanjeev) ही नवी जोडी यात पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जानेवारी- मनोरंजनाच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी नवीन प्रयोग करत असते. सोनी मराठी**( sony marathi)**देखील नवीन वर्षात नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘बॉस माझी लाडाची’ (Boss Mazi Ladachi ) ही नवीन मालिका लवकरत सुरू होत आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमये (bhagyashree limaye) आणि अभिनेता आयुष संजीव ( aayush sanjeev) ही नवी जोडी ‘बॉस माझी लाडाची’ या नव्या मालिकेतून बघायला मिळणार आहे. दोन वर्षानंतर भाग्यश्री लिमये या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या मालिकेत ती खडूस बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री आणि निर्माती मनवा नाईकने ( manava naik )तिच्या स्ट्रॉबेरी एन्टरटेन्मेंट प्रॉडक्शन हाऊसखाली या मालिकेची निर्मिती केली आहे. शिवाय मनवा नाईकने सुंदरा मनामध्ये भरली व तुमची मुलीग काय करते या मालिकेती निर्माती आहे. याशिवाय लेखिका मधुगंधा कुलकर्णीने या मालिकेचे लेखन केलं आहे. जुळून येती रेशीमगाठ, होणार सून मी या घरची तसेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेचे लेखन देखील मधुगंधा कुलकर्णीने केले आहे. वाचा- काय म्हणता ! प्रिया मराठे भाजी घेण्यासाठी चक्क बाजारात,काय घेतलं ते पाहा.. ‘बॉस माझी लाडाची’ या नव्या मालिकेत मराठीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेते डॉ. गिरीश ओक(dr girish oak) आणि रोहिणी हट्टंगडी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यामुळे या मालिकेबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिवाय अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने देखील या मालिकेचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. तिनं हा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की,रोज नवी ठिणगी वादाची, ‘बॉस माझी लाडाची’! तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय तिच्या लुकची देखील चर्चा होत आहे. आता ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या