JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रसिद्ध गायक Sonu Nigam ला कोरोनाची लागण, कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात

प्रसिद्ध गायक Sonu Nigam ला कोरोनाची लागण, कुटुंबही कोरोनाच्या विळख्यात

प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्याच्या कुटूंबालाही कोरोनाने घेरले आहे.

जाहिरात

Sonu Nigam

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona)विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. भारतात तिसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान, प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्याच्या कुटूंबालाही कोरोनाने घेरले आहे. मात्र, त्याने घाबरण्यासारखे काहीच नाही असे म्हटले आहे. सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे. सोनू निगमसह त्याचा मुलगा नीवान निगम (Nevaan Nigam), पत्नी मधुरिमा निगम (Madhurima Nigam) यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर 3 मिनीटांचा व्हिडीओ शेअर करत सध्या दुबईमध्ये असून कोरोनशी लढत आहे. तसेच तो पुढे म्हणाला, आमच्या शेजारी बरेच लोक कोरोनाचे आढळत आहेत. हे खूप वेगाने पसरत आहे. मला खूप वाईट वाटत आहे, कारण आत्ता कुठे आम्ही कामाला सुरुवात केली होती.

संबंधित बातम्या

थिएटर्स आणि फिल्ममेकर्स यांचे पुन्हा मोठे नुकासान होणार. पण आशा आहे की, या सर्वा गोष्टी लवकरच ठीक होतील. तसेच तो पुढे म्हणाला, आम्हाला कोरोनाची लागण झाली असली तरी हॅप्पी कोरोना पॉझिटीव्ह फॅमिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या