JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनम कपूरने मुलाला स्तनपान करतानाचा VIDEO केला शेअर, नवऱ्याने केली ही कमेंट

सोनम कपूरने मुलाला स्तनपान करतानाचा VIDEO केला शेअर, नवऱ्याने केली ही कमेंट

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते.

जाहिरात

सोनम कपूर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. अलीकडे, सोनमने एक गोंडस मुलगा ‘वायु’ला जन्म दिला आहे. प्रसूतीनंतर सोनम तिच्या मल्टीटास्किंग कौशल्याने लोकांना प्रभावित करत आहे. सोनमने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मुलाला स्तनपान करताना दिसत आहे. सध्या तिच्या या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या करवा चौथच्या तयारीची झलक दाखवली. सोनमची टीम तिच्या केसांचा मेकअप करताना दिसत आहे. मेकअप करताना, अभिनेत्रीने तिचा मुलगा वायुला स्तनपान करत आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले- ‘माझ्या टीमसोबत रील लाइफमध्ये परतणे आणि लोकांना भेटणे खूप छान वाटत आहे. माझ्या होम ग्राउंडवर परत आल्याने खूप आनंद झाला. लव्ह यू मुंबई’.

संबंधित बातम्या

करवा चौथचा फोटो पोस्ट करताना सोनम कपूरने खुलासा केला होता की, पती आनंद आहुजाला आवडत नसल्याने ती करवा चौथ उपवास ठेवत नाही. तिचा करवा चौथ लुक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. या लुकमधील तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

दरम्यान, सोनमने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सोनमचा नवरा आनंदने बायसेप्स इमोजी शेअर करत ‘मामा इज मेड फॉर दॅट’ अशी कमेंट कलीये. पत्रलेखासह अनेक सेलिब्रिटींनी प्रेम व्यक्त करत सोनमच्या मल्टीटास्किंग कामाचे कौतुक केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या