JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर अशी झालीये लेकीची अवस्था; रडून-रडून आईसाठी मागतेय न्याय

Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर अशी झालीये लेकीची अवस्था; रडून-रडून आईसाठी मागतेय न्याय

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट-   ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाटच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. सोनाली फोगाटचा घातपात झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आता सोनाली फोगाटची मुलगी यशोधराने आपल्या आईला न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू येत आहेत. नुकतंच एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रडून रडून सोनाली फोगाटची लेक यशोधराची वाईट अवस्था झालेली दिसून येत आहे. त्यांची लेक डोळ्यात अश्रू आणून सांगत आहे, माझ्या आईला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाचा योग्य तपास व्हायला हवा. तसेच अवघ्या १६ वर्षाच्या यशोधराने म्हटलं, जे दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे’. तत्पूर्वी सोनाली फोगाटचा भाऊ रिंकूने आपल्या बहिणीचा खून केल्याचा आरोप केला आहे. तिच्या जेवणात काहीतरी मिसळले होते. ते खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर गोवा पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आरोप रिंकूने केला आहे. रिंकूच्या मते, सोनालीच्या मृतदेहाचं दिल्ली किंवा जयपूरमध्ये पोस्टमॉर्टम व्हावं अशी त्याची इच्छा होती. कारण त्यांचे कुटुंबीय गोव्यात झालेल्या तपासावर समाधानी नाहीत. तर गोवा पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.

**(हे वाचा;** Sonali Phogat Death : सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट; 2 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ) पोस्टमार्टम रिपोर्ट- एबीपी हिंदीनं दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली फोगाटच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झालेल्या या धक्कादायक खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आला होता.सोबतच या प्रकरणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या